या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. १३ घामाच्या धारा चाललेल्या असतात, एकीकडे गार पाण्याचा चांदीचा तांब्या भरलेला असतो. तरी, त्यांचे काम सुरू तें सुरूच ! तीन वाजल्यानंतर ते आपल्या खासगी अभ्यासाच्या खोलीत व लायब्ररीत जातात. ह्या खोलीत त्यांच्या हातच्या अनेक मनोरम तसबिरी टांगलेल्या आहेत; व जगांतील उत्तमोत्तम व नामांकित चिताऱ्यांच्या चित्रांनी भरलेली अनेक सुंदर सुंदर पुस्तकें रचलेली दृष्टीस पडतात, व ती पाहतांना क्षुधा आणि तृषा ह्यांची सुद्धां शुद्धि राहत नाही. येथे काही वेळ वाचन अभ्यास, किंवा अति संघट्टणांतील मित्रांची भेट वगैरे घेतात. नंतर स्वारी पुन्हा खासगी कचेरीत जाऊन तास अर्धा तास बंधूसहवर्तमान संभाषण, किंवा एक दोन बुद्धिबळांचे डाव इत्यादि होऊन सायंकाळच्या सुमारास स्वारी देवदर्शनास, जनरल लायब्ररीकडे वगैरे जाते. परंतु सूर्यास्ताबरोबर तलावावर जाऊन संध्या मात्र कधीं चुकावयाची नाही. सारे बंधु भिन्न भिन्न दिशेकडे सहल करण्यास गेले असले, तरी सूर्यास्ताबरोबर ह्या मोठ्या भव्य तलावावर एकत्र व्हावयाचेच. ह्यांत बहुधा अंतर नाही. नंतर वाड्यांत जाऊन भोजन, वडिलांशी बोलणेचालणे, नंतर कधी कधी श्रीमंत तात्यासाहेबांच्या भजनांत कांहीं काल घालवून रात्रौ दहा वाजतां निजावयास जातात. ह्या नियमांत विशेष कारणावांचून कधीं व्यत्यय ह्मणून नाही. आतां संस्थानच्या कारभाराचे काम पाहूं लागल्यापासून कसा क्रम असेल तें सांगवत नाही. त- . थापि साधारण क्रम ह्यावरून सहजीं समजण्यासारखा आहेच. असा सततोद्योग ज्यांच्या आंगांशी खिळलेला आहे, त्यांस अशी विद्या व असे गुण प्राप्त व्हावेत ह्यांत आश्चर्य ते कोणतें ? त्यांच्या स्वभावाला वावगे अगदी खपत नाही. तरी ते अगदी मोकळ्या मनाचे आहेत. त्यांस मनुष्याची परीक्षा फार उत्तम आहे. चांगुलपणाची खात्री झाली की, ते त्याच्याशी अत्यंत निरभिमानपणाने व मित्रत्वाच्या नात्याने वागतात. विद्वानांचे व गुणीजनांचे आदरातिथ्य करण्यास ते नेहेमीं तत्पर असतात. पदरच्या-आपल्या तैनातीस असलेल्या प्रत्येक मनुष्यावर त्यांचा फार लोभ आहे. ते त्याच्याविषयी निरंतर दयाई दृष्टि ठेवतात. दुष्काळामध्ये सुद्धा होतां होईल तो त्यांनी कोणास हाल असें वाढू दिले नाही. ह्या त्यांच्या गुणांमुळे, त्यांच्या हरएक मनुष्याची