या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. त्यांच्यावर अत्यंत निष्ठा, व परम पूज्यबुद्धि आहे. आणि ते स्वतः निर्व्यसनी असल्यामुळे त्यांची सर्वांवर मोठी छाप आहे. THE सारांश, श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधि हे बी. ए. असून एल्. एल्. वी. चा अभ्यास अरीत आहेत. ह्यावरून ते पट्टीचे विद्वान् आहेत हैं| तर उघड आहे. शिवाय फोटोग्राफी, रीटचिंग, क्रिस्टोलियम पेंटिंग इत्यादि कला त्यांस चांगल्या प्रकारे अवगत आहेत. चार दोन ता. सांत पाहिजे त्या मनुष्यास पुढे बसवून ऑइलपेंटिंगने त्याची रंगात | ओळख आणणे हेही कौशल्य कांहीं सामान्य नव्हे. आणखी सूक्ष्मदृष्टीने जरी त्यांत कांहीं कमीपणा असला तरी, श्रीमंत हे खतः दीघाद्योगी असल्यामुळे, ती उणीव वर्ष सहा महिन्यांच्या अभ्यासांत सहज भरून निघण्यासारखी आहे. मात्र त्यांच्या गुणांची चीज करण्यास कोणीतरी गुणग्राहक पाहिजेत. कारण, एका संस्कृत कवीन मः। टले आहे: गुणयुक्तोपि पूर्णोपि कुंभः कूपे निमज्जति । का तस्य भारसहो नास्ति गुणकग्राहको यदि ॥ १ ॥ गुणवान्-पक्षी दोरी बांधलेला-पूर्ण-पक्षी भरलेला-असूनही, गुणग्रा. हक-पक्षी दोर ओढणारा नसेल तर घडाही विहिरीमध्ये बुडून जाईल. अथोत् गुणग्राहकावांचून गुणी मनुष्याचे गुणही जेथल्या तेथच लयात जातील. ह्यासाठी सदरहू गृहस्थ अत्यंत सुशील, मोठे श्रीमान्, घरदाज, विद्वान् व गुणी आहेत. तरी गुणग्राहक राजेरजवाड्यानी व स्वदेशभक्त बंधूंनी त्यांच्या गुणांचा लाभ करून घेतला पाहिजे,व अ. भिमान बाळगला पाहिजे. ह्मणजे ते होतकरू असल्याने आपल्या देशांत अगदी पूर्वीचा नामांकित चितारी दामू सातारकर; त्यानंतर सुप्रसिद्ध भिवा सुतार; त्यानंतर जगन्नाथ पिंपळखरे इत्यादि, मलवारांत नायडू व जगद्विख्यात् राजा रविवर्मा-इत्यादिकांनी कीर्ति गा. जविली-त्याप्रमाणेच हेही होतील येवढेच नव्हे तर, आमच्या महाराष्ट्रांतील हे सवाई रविवर्मा होतील, असा भरंवसा वाटतो. y श्रीमंत बाळासाहेबांसही आमची सविनय विनंती आहे की, त्यांनी आपण होऊनच थोडासा पुढाकार घ्यावा. केवळ औंधच्या राजवा