या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. १५ ड्यांत बसून कितीही तसबिरा काढल्या तरी, लोकप्रसिद्धि व्हावयाची नाहीं, व गुणांचे तेज फांकावयाचें नाही. ह्याकरितां आपणहूनच एक राजा रविवर्म्याच्या प्रसिद्ध कारखान्याप्रमाणे चित्रांचा मोठा कारखाना काढावा. त्यांत ऑइलपेंटिंगचें, फोटोग्राफचें, क्रिस्टोलियम पेंटिंग, वगैरे सर्व प्रकारचे काम व्हावें. ह्मणजे पुष्कळ स्वदेशाभिमानी व गुणग्राहक लोक सहाय करतील; व असा कारखाना व्यवस्थित चालल्यास फायदाही झाल्यावांचून राहणार नाही. ह्याविषयी श्रीमंतांनीही विचार करावा. झाले. अशा प्रकारे एका श्रीमान्, कुलीन, विद्वान् व गुणी मनुष्याची ओळख आमच्या सर्व स्वदेशबंधूंस करून देण्याचे काम जेवढे आमच्या हातीं होतें, व जें कर्तव्य असें आह्मांस वाटले तेवढे आह्मी करून चुकलों. ह्यापेक्षा अधिक आमच्या हाती काही नाही. आतां सरशेवटी आमच्या हेतूप्रमाणे श्रीमंतांच्या गुणांची चीज परमेश्वर करो, येवढे श्रीसच्चिदानंदचरणी मागणे मागून हा लेख पुरा करतो. प्रतिसांवत्सरिक परमेश्वरप्रार्थना का अथवा परमेश्वरचरणीं त्रयोदशगुणी विडा. श्लोक ( प्रहर्षिणीवृत्त.) केला त्वां परम वरप्रसाद देवा प्रेमाचा, तुजजवळी अखंड ठेवा । STE शोभे की, अनुपम नांव विश्वपाळ talat दीनाला तुजविण कोण बा कृपाळ ॥ १ ॥ रक्षावा, भवनिधिंतून दीन दासगाव नम्रत्वे, शरण तुझ्या सदा पदास । लाश ठेवी हा, चरणरजी अनन्यभाव की लागेना तव करुणेविना निभाव ॥ २ ॥