या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. २ 'केरळकोकिळचा एक वाचक'-तिरोडा-भंडारा-" पु० १२ अंक ४ मध्ये प्रश्न आहे, व त्याचे उत्तर पांचव्या अंकांत आहे, तो प्रश्न कोणी केला, व उत्तर कोणी दिले ? हे माझ्या अल्पबुद्धीस मोठे गूढ वाटते. कारण, हे दोन्ही अंक एकदम प्रसिद्ध झालेले आहेत. तेव्हां चवथ्या अंकांतील प्रश्न लोकांत प्रसिद्ध होऊन पांचव्या अंकांत त्याचे उत्तर देणे असंभवनीय दिसते. मला वाटतें ही दोन्ही कामें बहुधा आपल्या खोलीत एका मेंदूनेच केली असावीत !!! दिलेल्या तसदीची माफी करून याचा खुलासा केल्यास मी आपला फार आभारी होईन. इ० इ०." ह्यावर उत्तर-ज्या खोलीतून व ज्या मेंदूतून प्रश्न बाहेर पडावा, त्याच खोलीतून व त्याच मेंदूंतून उत्तर बाहेर पडावें हे अगदी साहजिकच आहे. त्यांत अल्पबुद्धीसही गूढ नाही, आणि महबुद्धीसही गूढ नाही. पण ज्या खोलीतून व ज्या मेंदूतून त्याविषयी शंका उद्भवते, त्याविषयी मात्र अल्पबुद्धीसच नव्हे पण महबुद्धीसही मोठे गूढ आहे खरें, उत्तरे दुसऱ्याकडून येवोत, वा न येवोत, ती लिहून पाठविणे हे लेखकाचे काम; व सोयीप्रमाणे अक छापणे हे मालकांचे काम. आतां, हा उत्तराचा अंक संयुक्त छापला गेल्यामुळे मूळ प्रश्नाचे सौरस्य गेले, ही गोष्ट खरी आहे. पण त्यास उपाय नाही. "केरळकोकिळचे लेखोत्पत्तीचे व प्रसिद्धीचें स्थान, ह्यांजमध्ये६०० मैलांचें अंतर असतें.” ही गोष्ट वाचकांस कृपा करून ध्यानात ठेवण्याविषयी पुनःपुनः विनंति आहे. ब -ए० के० का० जना मुंबई ता० २०।१०।९८, "रा. रा० केरळकोकिळकर्ते यांस: सा० न० वि० वि० आमच्या कन्याविक्रयदुष्परिणाम नाटकावर आपल्या जून १८९८ च्या अंकांत आलेला अभिप्राय आह्मीं साद्यंत वाचला. त्या संबं. धानें आझांस जे काय लिहावयाचे आहे ते मागाहून अलाहिदा लिहून कळवू. पण तूर्त सदरहू टीका करतांना आपल्या हातून न्यायमूर्ति रानडे यांजसंबंधानें जी अक्षम्य चूक झाली आहे त्याची दुरुस्ती आपण आपल्या जुलैच्या अंकांत करावी अशी विनंती आहे. तसे न झाल्यास न्यायमूर्तीसंबंधाने लोकांचा गैरसमज होण्याचा बराच संभव आहे. कळावें, लोभाची वृद्धि शुक्कैदुवत् असावी, ही विनंती. आपला, मोरो विनायक शिंगणे."