या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. ह्यास उत्तर-न्यायमूर्ति रानडे ह्यांच्या संबंधानें कोकिळांत मुळी चूकच झालेली नाही. मग 'अक्षम्य' कोठची ? सदरहू लेख जे कोणी लक्ष्यपूर्वक वाचतील, त्यांस आमच्या लेखांतील हेतु सहज कळेल. 'न्यायमूर्ति' झटले की लागलीच 'रानडे' समजावयाचे हा सांप्रदाय कोठचा ? अभिप्राय देणारे रावबहादुर ध्रुव, व सूचना करणारे रावबहादुर रानडे ह्या दोन्हीही न्यायमूर्तिच असल्याचे आपणच सांगितले आहेना ? शिवाय " रावबहादुर ध्रुवांनी रानड्यांप्रमाणेच जर काही ग्रंथकारांस सूचना केल्या असत्या, तर त्यांचा रसिकपणा आणि थोरवी चांगली व्यक्त झाली असती." ह्या वाक्यावरून तर आमचे झणणे कोणाविषयी काय आहे हे स्पष्ट होतें. न्यायमूर्ति रानड्यांसारख्यांकडून पूर्ण विचार केल्याशिवाय कलमांतून एक अक्षरही बाहेर पडावयाचे नाही, अशी आमची तर काय, पण सर्व महाराष्ट्र देशाची खात्री आहे. अशा सत्पुरुषाविषयी लोकांत 'गैरसमज ' उत्पन्न करण्यास आमचे मन लेशमात्रही धजणार नाही. तेव्हां विनाकारण पदर पसरावयाचा कोणापुढे ? आतां त्या लेखांत कोणाला याउपरही संदिग्धपणा वाटत असेल तर आणखीही असा स्पष्ट खुलासा करतो: “सदरहू पुस्तकावर अभिप्राय देणारे रावबहादुर ध्रुव व सूचना करणारे रावबहादुर रानडे ह्या 'उभयही न्यायमूर्ति 'च आहेत. अभिप्राय दिला आहे तो ध्रुवांनी दिलेला आहे. रानड्यांनी मुळीच अभिप्राय दिलेला नाही. त्यांनी सूचना केल्याचा ग्रंथकारांनी उल्लेख मात्र केला आहे." येवढ्यावरून न्यायमूर्तीतील संदिग्धता नाहीशी होईल. अभिप्रायांतील सत्यासत्याबद्दल अवश्य लिहावें. कृपालोभाची वृद्धि उभयपक्षीही पाहिजे, ही विनंती. -ए० के० को To The Manager, Keralkokil, Ramvadi, Bombay. Sir, I am in receipt of your No. 1, 2, 3, Book 12 for which many thanks. Please, Continue the Magazine without interruption. Send one number V.P. for your subscription.