या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. छापण्यासाठी माझें काम बहुतेक पुरे होत आले आहे. ह्याकरितां आपणांस तें प्रसिद्ध करण्यास अधिकार काय तें कृपा करून कळवावें. Heart PRMERH आपला विश्वासपात्र, BIPTी आर. आत्माराम, सिव्हिलसर्जन, हिंगोली. ता० --तें सारेंच आपणास छापणे असल्यास मी केलेले भाषांतर अधिक खुलासेवार-हणजे वाचस्पतिमिश्राने केलेल्या पातंजली भाष्याच्या आवश्यक भागासहवर्तमान आपल्या मासिक पुस्तकांत देण्यास तयार आहे. आर. आत्माराम." ह्यावर उत्तर-आमच्या आश्रयदात्यांनी आमच्या पुस्तकाचा गौरव केला, ह्याबद्दल आहीही त्यांचे उपकारी आहों. ते आपण अत्यंत परिश्रमाने केलेलें राजयोगाचे भाषांतर आपणहून 'केरळकोकिळां'त देण्यास तयार होतात, ह्याबद्दल तर आह्मी त्यांचे अनंत उपकार मानतो. त्यांस हस्तलिखित प्रत आह्यांकडे पाठविण्याविषयी अगत्यपूर्वक विनंति आहे, ती पाहून कसे करावयाचें तें कळविण्यात येईल. ह्या मजकुराचे पत्र त्यांनी आमच्या मुंबईच्या पत्त्यावर पाठविले, हाणून उत्तर देण्यास इतका विलंब लागला. ह्याबद्दल दिलगिरी वाटते, परंतु उपाय नाही. दुसऱ्या मुद्याच्या संबंधाने मात्र आमचा मतविरोध आहे. डाक्टरसाहेब ह्यांस राजयोगाचे मराठी भाषांतर करण्यास परवानगी मिळाली असेल, आमचे ना ह्मणणे नाही. पण तेवढ्यावरून आझी जे भाषांतर करतो, तें परवानगीवांचून करतो, असे मानण्यास साधन काय ? बरें क्षणभर कबूल केलें की, आह्मी परवानगीवांचूनच भाषांतर करतो, तरी आह्मी अतिनम्रपणे विचारतों की, 'आपणास तें प्रसिद्ध करण्याचा अधिकार काय ? ' असें आझांस विचारण्याचा डाक्टरसाहेबांस तरी अधिकार पोचतो काय ? हा प्रश्न खुद्द श्रीमद्विविवेकानंद स्वामी, किंवा प्रथम प्रसिद्ध केलेला एखादा पुस्तककार विचारील तर ती गोष्ट निराळी. पण तो प्रश्न विचारण्याचा अधिकार डाक्टरसाहेबांस तर मुळीच पोचत नाही. तेव्हां त्यावर आह्मांस उत्तर देण्याचेही काही प्रयोजन नाही, हे उघड आहे. तथापि आमच्या आश्रयदात्या डाक्टरसाहेबांस आझी मोठ्या आनंदाने कळवितों की:--- “आपण राजयोगाचे मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्याची परवानगी मिळविली आहे. आमी ती तर मिळवून शिवाय श्रीम