या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. द्विवेकानंद स्वामींच्या इतर ग्रंथांचीही भाषांतरे करण्यास परवानगी मिळविली आहे. येवढेच नव्हे, तर श्रीमत्परमहंस रामकृष्ण मठाकडून 'ब्रह्मवादिन' मासिक पुस्तकाचे व त्यांतील लेखांचें "महाराष्ट्रब्रह्मवादिन् ” नामक मासिक पस्तक काढण्याचीही पर. वानगी मिळविली आहे." । हे आपणांस व आमच्या इतर वाचकांसही कळावें. एडिटर 'केरळकोकिळ.' काशद्धिपत्र. के. को. पु. १२ अं. १ पान १८ ओळ २१ वी. "मी तुमचे बरोबर बोलत असतो, आणि त्याच वेळेस दुसरा मनुष्य बाजूस उभा राहून मी काय बोलतों तें ऐकत असतो, व विचार करतो." असें आहे. तेथें: "उभा राहन" ह्या शब्दांच्या पढें:-"ऐकत असल्याप्रमाणे" इतके शब्द अ. धिक वाचावेत. तसेंच: जमा पु. १२ अं. २ पान ३० ओळ २३ वी. "कपाळ दुखू लागले तर, होईल तितकें जलद नाकानें उदक प्राशन करण, ही गोष्ट फार चांगली आहे." असें आहे. तेथें:"जलद" ह्या शब्दापुढें:-"सकाळी उठन" इतके शब्द अधिक वाचावत तसेंच-पु० १२ अं. २ पान ३० ओळ २९. "निश्चल बसतां आलें झणजे मग...अभ्यास. एखाद्या शाळेत शिकल्यान माणे करून त्यांत प्रवीण झाले पाहिजे.” असे आहे. त्यांतील 'अभ्यास' ह्या शब्दापुढील "एखाद्या शाळेत शिकल्याप्रमाणे" इतके शब्द वर्ण्य करून-न वाचतां-त्यांच्या ऐवजी "काही श्रेष्ठ आचार्यांच्या मताप्रमाणे" असे शब्द वाचा. वेत. आणखी: पु. १२ अं. २ पान ३५ ओळ १७ ह्यांत "ही विघ्ने जगामध्ये मोठ्या प्रमाणाने असणाऱ्या मध्यम प्रतीच्या वर्गाला फार येतात." असें वाक्य आहे. त्याच्या ऐवजी: "ह्या जगांतील थोर पुरुष (महात्मे) ह्या मध्यम स्थितींतील लोकांतूनच निपजताया जतात." असें वाचावें. --ए० के० को०