या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळा. पण ___पु० १३] [अं०२ अमृतसर येथील सुवर्ण देवालय. प TRARAN । तुकारामांनी लंकेचे वर्णन केले आहे, तें असें लकेमाजी घरे किती ती आइका । सांगतसे संख्या जैशी तैशी॥१॥. पांच लक्ष घरें पाषाणांची जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥२॥ कोटि घरे जेथें कांशा आणि तांब्याची । शुद्ध कांचनाची सप्तकोटी ३ तुका ह्मणे ज्याची संपदा येवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥४॥ हे कोणत्या आधाराने त्यांनी लिहिले समजत नाही. ह्यांत सोन्याच्या घरांची संख्या सर्वांहून अधिक धरली आहे. खरे मटले ह्मणजे ती संख्या कमी असावी हे व्यवहारास अनुरूप दिसते. परंतु ही गोष्ट युगांतरीची असल्यामुळे, ह्यांत तथ्य किती व अतिशयोक्ति किती हे समजण्याला फारसा मार्ग नाही. तरी, लंकेमध्ये सुवर्णाची घरें मुळीच नव्हती असें कोणासही ह्मणवणार नाही. अर्वाचीन कालांतही सुवर्णाची घरे देवालये कोणी मुळीच बांधली नव्हती असे