या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नाही. अमृतसर येथे सुवर्णाचे देवालय अद्यापही प्रसिद्ध आहे. त्याचे चित्र आह्मी वर दिले आहे. आतां खाली त्याचा थोडासा इतिहास सांगतो. ___ अमृतसर में पंजाबामध्ये लाहोरच्या खालोखाल शहर असून ते रावी आणि बियास ह्या दोन नद्यांच्या मध्ये आहे. शीख धर्माचा मूळ संस्थापक बाबा नानक हा इ० स० १४६९ मध्ये जन्मला. प्रथम तो धान्याचा वगैरे व्यापार करी. पुढे तो कबिराचा शिष्य बनून एकेश्वरी मताचा उपदेश करूं लागला. धर्माच्या बाबतींत आग्रह नसावा. कोणीही मनोभावाने केलेली सेवा ईश्वरास पावते. हे त्याच्या उपदेशांतील तत्त्व होते. ह्याने सर्व हिंदुस्थानभर उपदेश करण्यासाठी दिल्लीच्या बादशहाची परवानगी घेतली होती; व ता मक्का मदिनेपर्यंतही जाऊन फिरून आला होता. परंतु पजाबच्या लोकांवर त्याच्या उपदेशाचा परिणाम फार चांगला झाला. तय त्यास पुष्कळ अनुयायी मिळाले. त्यांसच शीख असें ह्मणतात. शाख हा शिष्य या शब्दाचा अपभ्रंश होय. हाच पंथ पुढे बळावला नानकाच्या मागून त्याचे शिष्य 'गुरु' ह्या संज्ञेनें गादी चालवू लागला ह्याचा तिसरा गुरु रामदास' ह्याजवर अकबर बादशहाची फार ना होती. ह्याच रामदासाने अमृतसर येथे एक मोठा तलाव बाप त्याचे पाणी पाहून व तेथील रम्य स्थान पाहन अकबर बादशहा फार खष झाला; व हे पाणी केवळ अमृतासारखे आहे असे ह्मणाला. ह्यावरून गुरु रामदासाने त्या सरोवराचें नांव अमृतसर असें ठेविले, व तेथेच एक शहर वसविले. त्यावरून त्या शहरासही अमृतसर असंच नाव पडले. ह्याच सरोवराच्या मध्यभागी त्याने एक देवालय बांधण्यास सुरवात केली होती, तें काम त्याच्या मुलाने पुरे केले. ह देवालय व तीर्थ ह्यांची अत्यंत पवित्र क्षेत्रांत गणना होती. इ० स० १७६२ मध्ये अहंमदशहा अफगाणी ह्याने हिंदुस्थानावर खारी करून शीख लोकांचा पराजय केला. त्या वेळेस त्याने अमृतसर शहराचा अगदी सत्यनाश करून सोडला. तेथील देवालय सुरुंग लावून उडवून दिले. तीर्थामध्ये दगड, चिखल घालून ते बुजवून टाकलें, व गोवध करून तेथील जागा भ्रष्ट केली! परंतु सुदैवानें कांहीं