या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. कालानंतर त्या तीर्थाचा पुनरुद्धार झाला. इ० स० १८०२ मध्ये रणजितसिंगाने त्या तीर्थाचा जीर्णोद्धार करून अमृतसर शहरही पुन्हा वसविले. ह्या तीर्थाप्रीत्यर्थ व देवालयाप्रीत्यर्थ त्याने मनस्वीच पैसा खर्ची घातला. सर्व देवालयावर सुवर्णाचें गिलिट चढविलेले तांब्याचे पत्रे मारले. तेव्हापासूनच त्या देवालयाचे 'सुवर्णदेवालय' हेच नांव प्रसिद्ध झाले. ह्याच समयीं त्याने तेथें एक नवा किल्ला बांधून त्याचे नांव गोविंदगड असें ठेविलें. DIRAIME R च ह्या देवालयाचा खालचा भाग, ताजमहालाप्रमाणेच सर्व संगमरवरी दगडाचा असून त्याच्यामध्ये सोन्यारुप्यांत निरनिराळ्या रंगांची रने जडलेली आहेत. मध्यभागी मोठा भव्य सभामंडप असून त्यावर मघडबरी आहे. मेघडंबरीचे छत सोन्यारुप्याच्या मुलाम्याच्या नकशाचे असून त्याच्या मध्ये मध्ये हजारों लहान लहान आरसे बसविलेले आहत. भितीवरही अशीच सुंदर वेलपत्ती व चित्रे काढलेली असून त्यात खुपसुरत रत्नांचे जडाव काम केलेले आहे. उत्तम झिलईदार रंगारंगांचे दगड लावून गालिचा पसरल्याप्रमाणे जमीनही मोठी प्रेक्षणीय केली आहे. मधील सभामंडपाच्या समोरच गुरूचे व्यासपीठ असून पुढे ग्रंथ उघडून ठेवलेला असतो. त्यांतील पचे तालसुरांत ह्मणून गुरु सवीस त्यांतील अर्थाचे निरूपण सांगतो. हे निरूपण ऐकण्यास स्त्रीपुरुषांची मोठी गर्दी जमते. प्रत्येक जण त्या ग्रंथापुढे फळफळावळ, धान्यधुन्य, पैसाअडका, वस्त्रप्रावर्ण, काहींना काही तरी ठेवतो व भक्तिभावाने तेथील ग्रंथास व गुरूस नमस्कार करतो. 1 अमृतसरांतील रस्ते वांकडेतिकडे असून अरूंद-अगदी चिंचोळे असे आहेत. परंतु अलीकडे पुष्कळ सुधारणा होत चालली आहे. येथे काश्मीरच्या शाली करण्याचा कारखाना फार मोठा आहे. हे शहर व्यापारामध्येही चांगले प्रसिद्ध आहे. णिका निरो बादशहाचा सुवणेप्रासाद. पूर्वप्रदेशांत जशी दिल्लीची बादशाही तशीच पश्चिमप्रदेशांत रोमची बादशाही प्रसिद्ध होऊन गेली. हिच्यामध्ये मानवी ऐश्वर्याचा व कलाकौशल्याचा कळस होऊन गेला झटले तरी चालेल. आणि येवख्या साक्षीला निरो. बादशहाचा एक सुवर्णप्रासादच बस्स होईल.