या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रोमन बादशाहीच्या नाशाच्या जिकडेतिकडे ज्या खुणा दिसत आहेत, त्यांतच पालेटाईन व इस्क्वीलाईन ह्यांच्यामध्ये एक मोठी पडित जागा किंवा मैदान दिसते. ह्या जाग्याची रुंदी दोन मैल व लांबी सुमारे चार मैल आहे. येथेच निरो बादशहाने सर्व जगामध्ये केवळ अद्वितीय असा आपला सुवर्णप्रासाद बांधला होता; व खतःही तो तेथेच रहात असे. ह्या वाड्याचा घेर, विस्तार, त्यांतील नानाप्रकारचे चमत्कार, कळसूत्री रचना ह्यांपुढें धर्मराजाची मयसभा सुद्धा काही नव्हे. त्याचे वर्णन कोणास खरें सुद्धां वाटणार नाही. आमी जी त्याची खाली माहिती देणार आहों ती तर शुद्ध कल्पित कादंबरी, किवा आरबी नाइटाच्या एखाद्या गोष्टीचाच उतारा आहे असे वाटेल. परंतु तिच्या सत्यत्वाविषयीं यत्किंचितही संशय नाही. कारण, ती खऱ्या खऱ्या परदेशीय इतिहासांतून घेतलेली आहे. शालान ह्या वाड्याचा घेर आठ चौरस मैल असल्याचे वर सांगितलेच आहे. पण त्याच्या आंत काय काय होतें ह्याची कल्पना होण मा। नवी तांस केवळ दुस्तर आहे. ह्मणजे तेवढ्यात एक प्रतिसृष्टि, किवा कृत्रिम एक खतंत्र भूरचनाच होती मटले तरी चालेल. त पृथ्वीवरील बहुतेक देशांतील लोक, सृष्टिसौंदर्य, हवा, उद्भिज वा सर्व काही त्या राजवाड्यांत राहन दृष्टीस पडावें अशी तजवीज कलला होती. राजवाड्याभोंवतीं निरनिराळे वाडगे करून त्या प्रत्येकात एक एक तम्हेचा देखावा दाखविला होता. एका वाडग्यात - निराळे वाफे करून त्या प्रत्येकांत पृथ्वीवरून जमा करून आणलल सर्व कंदच दृष्टीस पडत. ह्मणजे कांदे, बटाटे, रताळी, सुरण, भुइमुगाच्या शेंगा, कणगें इत्यादि, दुसऱ्या वाडग्यांत दरोबस्त पर दृष्टीस पडत. जसें भात, गहं, जोंधळे, बाजरी, तूर, हरभरे इत्यादि ह्याचप्रमाणे दोराचे जिन्नस ह्मणजे रेशमी किडे, कापूस, ताग इत्यादिक. एके ठिकाणी नारळी, पोफळी, ताड, माड इत्यादिकांचीच बाग दृष्टास पडे. एके ठिकाणी आंबे, फणस, नारिंगें, चकोत्री, अननसे, पेरू, केळी, द्राक्षे इत्यादि सर्व फळझाडेंच दृष्टीस पडत. एका ठिकाणी गुलाब, गुलछबू, पारिजातक, मोगरा, चमेली, वगैरे सारी फुलझाडेंन दृष्टीस पडत. एका ठिकाणी सर्व औषधी वनस्पतीच गजबरलेल्या दिसत.