या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. २९ परंतु ही रचना कांहींच नव्हे. कारण, ती कोणताही राजा करूं शकेल.. पण त्यांत जी कृत्रिम सृष्टिसौंदर्याची रचना केली होती, ती केवळ अप्रतिम होय. ती रचना ही की, त्यांत कृत्रिम नद्या, ओढे, सरोवरें व पर्वतही केलेले होते. नद्यांचा उगम डोंगराळ प्रदेशांत होऊन ती वहात वहात सपाट प्रदेशांत आलेली दृष्टीस पडे. तीस नदीनाले मिळून ठिकठिकाणी संगमाचा देखावा दृष्टीस पडे. एक दोन ठिकाणी उंच खडकावरून पाण्याचा धोत पडून धबधबा झालेला दृष्टीस पडे. सरोवरांतून कमळे, पद्माक्षे वगैरे पुष्पे असून, निरनिराळ्या रंगांचे मासे, कांसव, सुसरी वगैरे प्राणी त्यांतून विहार करीत असलेले दृष्टीस पंडत. या नील मिरजा का येथे सर्व जातींच्या पशूचा व पक्ष्यांचा संग्रह असेल हे तर सांगणे नकोच. पण त्या प्राण्यांना हल्लीच्या प्राणिसंग्रहाप्रमाणे पिंजऱ्यामध्ये कोंडमारा करून मदाड, निस्तेज व जरत्कारू मात्र करून सोडलेले नव्हते. तर त्यांच्याकरितां निरनिराळी अरण्ये, घोर जंगले तयार करून त्यांत त्यांस यथेच्छ विहार करावयास सोडलेले असत. ह्या सवे प्राण्यांना त्या कृत्रिम जंगलांत विहार करावयास सांपडे, व तेथे सर्व प्रकारचे त्यांस त्यांचे भक्ष्य मिळण्याची तजवीज केलेली असे. ते विहार करतांना सर्व मनुष्यांच्या दृष्टीस पडत. परंतु त्यांनी कोणासही इजा करूं नये, व बाहेर जाऊ नये, अशी तजवीज केलेली असे. ही सर्व मौज पहाण्याकरितां राजवाड्यासच लागून दोन दोन मैल लांबीच्या अनेक ग्यालया केलेल्या होत्या. त्यांतून फिरावयास गेले, ह्मणजे हवा तो चमत्कार दृष्टीस पडे. Jory एका घोर जंगलामध्ये रानहत्ती क्रीडा करतांना दृष्टीस पडत. कोठे - कोठे कृत्रिम गिरिकंदरामध्ये पंचानन टपून बसलेले किंवा निद्रासुखानुभव घेतलेले दृष्टीस पडत; कोठे कोठे तुंगवृक्षास तुळवंडासारखा वेढा घालून शेपटीच्या विळख्याने ससे, हरण, इत्यादि पशु धरतांना अजगर दृष्टीस पडत. कोठे सिंह, कोठे लांडगे, कोठे रानडुकर, कोठे तरस, कोठे जेब्रे, कोठे नू, कोठे जिराफ, कोठे उंट इत्यादि हजारों पशु आपआपल्या नेमिलेल्या कृत्रिम अरण्यांत फिरतांना दृष्टीस पडत. तसाच कोणी मोठा पाहुणा आला झणजे सिंह, वाघ, अशा हिस