या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. सर्व आपआपल्या गतींत फिरावयास लागत. हा दिवाणखाना ह्मणण्यापेक्षा ह्यासच मयसभा ह्मणून नांव दिले तर फार शोभेल. कारण ह्यांत सर्व कळसूत्राचेच खेळ व कौशल्य भरलेले असे. दरवार भरल्यापासून तो बरखास्त होईपर्यंत झाडून सारी बडदास्त ठेवण्याचे काम सारे ह्या कळसूत्रांत असे. दरबारच्या प्रत्येक स्तंभावर पंखें लावलेली चंदनाची मुलें असत. ती आपल्या हातांत मोठमोठाले पंखे घेऊन वारा घालीत. मध्येच आकाशामध्ये सुंदर देवांगना येऊन त्या सावर पुष्पवृष्टि करीत. दरबार बरखास्त झाले हणजे स्वर्गातील द्वारें उघडल्याप्रमाणे एकदम मेघडंबरीतील कपाटे उघडून देवदूत येत, व आपल्या हातांतील रत्नजडित हजाऱ्यांनी सर्वांवर गुलाबपाणी, लव्हेंडर इत्यादि सुगंधी द्रव्यांचा वर्षाव करीत. इतकेंच वर्णन हल्ली उपलब्ध आहे. तेव्हां तेथे प्रत्यक्ष काय काय असेल ह्याची वाचकांनीच कल्पना करावी. निरोच्या पश्चात् ह्या राजवाड्याला क्षयरोग लागला. व्हेसपासियन ह्याने त्या राजवाड्याचा भाग मोडून टाकला. मोठे सरोवर होते ते बुजवून तेथें एक उंच मनोरा उभा केला. पालेटाइनच्या बाजूचा बहुतेक भाग मोडून टाकला. डोमिटियनने पहिले मोडलेले काम पुन्हा बांधले. एवढेच नव्हे, तर त्याला आणखीही कित्येक नवे चमत्कार जोडले. पुढे पोप सिक्टस ह्याने सेंटपिटर्सबर्गकडून हुकूम आणून दोन तीन मनोरे उभे केले. अशी बचबच होतां होतां अखेर पांचव्या शतकांत हा वाडा गोथ लोकांनी लुटला. त्या वेळी एक सबंध खोली सोन्याच्या नाण्यांनी भरलेली, व एक सोन्याच्या चिलखतांनी भरलेली सांपडली! सोने, रुपे, हस्तीदंत सर्व काही त्यांनी लुटून नेले. पृथ्वीवरील निरनिराळे देशांतील लोकांचे पुतळे करून ठेवलेले होते, ते सर्व नेण्यास त्यांस सात जहाजें लागली. ह्यानंतर कांहीं रोमन सरदारांनी पुन्हां हातपाय झाडले होते, परंतु त्यांत कांहीं विशेष निष्पन्न झाले नाही. अखेर फर्निज पोप व इतर राजे ह्यांनी ह्या बादशाहीस रसातळास पोचवून ते अद्वितीय इंद्रभुवन व त्यांतील लोकोत्तर सामान ह्याचे अगदी नायनाट करून सोडलें !! तेव्हां कालो विचित्रागतिः । येवढेच ह्मणावें, दुसरे काय ?