या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. ह्या नांवाची त्यांनी जी एक दिव्य औषधी तयार केली आहे ती, व तिचे अद्भुत गुण हेही त्यांनी तेथे दाखवून दिले. आणि त्यावरून त्यांची विद्वत्ता व वैद्यशास्त्रांतील शोध केवळ अपूर्व होत, हे आमी मोठ्या आनंदानें कबूल करतो. हा परीक्षेचा समारंभ आमच्या ह्या फेरो शहरच्या मध्यावर बांधलेल्या सुंदर व भव्य अशा सार्वजनिक इमारतींत झाला. ह्या वेळी नाना जातींचे लोक, ह्या शहरांतील बहुतेक लोक व कामगार, परकीय आलेले गृहस्थ ह्या सर्वांच्या व आमच्याही समक्ष त्यांनी नानाप्रकारचे औषधिचमत्कार करून दाखविले. त्यांपैकी एक विशेष अद्भुत होता, तो येथे दाखल करतो. गजानन त्यांनी कितीएक टोड नांवाचे जिवंत विषारी बेडूक घेतले. परंतु ते त्यांनी आणलेले नव्हते. तर त्यांत कोणाला अंदेशा घेण्यास जागा राहूं नये ह्मणून मुद्दाम ते दुसऱ्याकडून आणविले होते. नंतर एका मोठ्या कामदारास जवळ बोलावून त्यांपैकी कोणतेही पांच बेडूक निवडून काढावयास सांगितले. त्याने त्यांपैकी भले मोठमोठे पांच निवडून काढून त्यांच्या हाती दिले. ते जनरो सोमारिनी ह्यांनी आपल्याजवळ बाजूसच एका बाकापाशी ठेवले. नंतर ते सर्व प्रेक्षकांच्या पुढे येऊन त्यांच्या देखत एक एक बेडूक फाडून त्याच्या उभ्या दोन दोन चिरफळ्या केल्या ! त्यांपैकी पांच शकले एका हातात घेऊन ती पिळून त्यांचा विषारी रस एका पेल्यांत काढला. आणि दुसरी पांच शकले घेऊन त्यांचाही रस त्यांत पिळला. नंतर त्यांनी तो एक वेळ नीट ढवळून सर्वांसमक्ष चट्ट सारा गट्टकर पिऊन टाकला! आणि तो रिकामा पेला टेबलावर ठेवून ते सर्वांच्या समोर आले. एक क्षण गेला असेल नसेल, तों ते मूर्छा आल्याप्रमाणे निचेष्ट पडले. त्यांचे हातपाय थरथर थरथर कांपत होते. त्यांचे शरीर निस्तेज होऊन, त्यावर शुद्ध प्रेतकळा आली. ते अधिकाधिक अंगास अळोकेपिळोके देऊ लागले, व मधून मधून भयंकर केवळ प्राणोत्क्रमण होण्यासारखे त्यांस गचके येऊ लागले. ती सर्व स्थिति पाहून पाहणारांनी तर निश्चयाने खूणगांठ बांधली की, ह्या प्यालेल्या विषापासून हे कांहीं आतां बचत नाहीत, खास मरणार. त्यांची पुरती शंभर वर्षे भरली."