या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. "इतक्यांत त्यांनी हळूच आपला हात वर केला, आणि जवळच ठेवलेल्या एका भांड्यांतून आपल्या 'आव्हिटोनो' नामक दिव्य औषधाची एक चिमट घेऊन ती तोंडांत घातली आणि गिळली. त्या औषधीचा गुण काय सांगावा! ती लागू पडण्यास एक निमेषाचा सुद्धा अवकाश लागला नाही. त्यांना लगेच ओकारी सुरू झाली, आणि पोटांत गेलेलें सारें विष भडाभड ओकून पडले!! तेव्हां त्यांनी आपले तोंड धुतले, आणि निखालस पूर्वीप्रमाणे ताजेतवाने होऊन ते प्रेक्षकांपुढे उभे राहिले. तेव्हां त्यांच्या अपूर्व गुणाची फारच वाहवा केली, व त्या जयघोषानें सारी इमारत त्या वेळी अगदी घुमून राहिली. तथ जमलेल्या मोठमोठ्या विद्वानांनी त्यांस परमादराने आपआपल्या घरी बोलावून नेले. तेथेही त्यांनी आपले सर्व सामान आणवून पुष्कळ प्रकारची औषधे व चमत्कार दाखविले. त्यांच्यापाशी एक जातीच्या सर्पापासून तयार केलेली पूड आहे, ती कोणत्याही जातीच्या तापावर अगदी बिनतोड लागू पडते. तिचे त्यांनी निरनिराळ्या दर्जाच्या व धंद्यांच्या लोकांवर निरनिराळे प्रयोग करून सर्वास अगदी चकित करून सोडले. त्यांच्या पुढें ताप ह्मणून कसला तो थान्यामोयाला उभा राहत नसे. त्यांनी एक सुगंधी उटणे तयार केले आहे, त्याने जखमा, चरके, खोका, भाजलेले, इत्यादि कोणत्याही दुखापता तत्काल बऱ्या होतात !" Share ब्रह्मवर्तास शेवटच्या बाजीरावापाशी असलेले वामनराव वैद्य; पुण्याचे बापुसाहेब मेहंदळे, व इसलामपूरचे बापू वैद्य ही सर्व आमच्या देशांतील प्रकरणेही अशीच असावीत असे दिसते. MS जगंतराजयोगकाशा स प्रकरण पांचवें. चिन्मय-प्राणायाम. ISTORIESnny आतां आपणास प्राणायामाशीं गांठ घालावयाची आहे. योग्याच्या मताप्रमाणे फुप्पुसाच्या गतीला ताब्यांत आणणे, ही ह्याची पहिली पायरी होईल, हे आपणास कळून चुकले आहे. शरीरांत चालणाऱ्या