या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. अत्यंत सूक्ष्मशक्ति आपणास कळाव्यात, हेच काय ते आपणास करावयाचे आहे. आमची मने बाह्यज्ञानांतच वहिवाटत असल्यामुळे, आंतील सूक्ष्मशक्तींविषयी त्यांचे ज्ञान नष्टप्राय झालेले असते. गातें जर आपणास प्राप्त होईल, तर त्यांच्यावर आपला अंमलही बसू शकेल. हे ज्ञानरसप्रवाह प्रत्येक स्नायूला जीवनशक्ति पोंचवीत पोचवीत, शरीराच्या बाह्यभागावर सर्वत्र खेळत असतात, पण ते आझांस समजत नाहींत. योगी ह्मणतो, त्याचेही आपणास ज्ञान होईल. कोणत्या रीतीनें ? : फुप्पुसाच्या हालचालीपासून तों तहत ह्या प्राणाच्या यच्चयावत् हालचाली जर आपणास कळू लागतील, व त्यांच्यावर आपला अंमल बसेल, आणि यथोचित कालपर्यंत तो टिकेल, तर आपणास सूक्ष्मशक्तींवरही पगडा बसवितां येईल. जिजाणा आतां आपण प्राणायामाच्या अभ्यासापर्यंत येऊन थडकलो. ताठ बसून शरीर सरळरेषेत ठेवले पाहिजे. पृष्ठरज्जु पाठीच्या कण्याच्या आंतील बाजस आहे तरी, त्याशी ती संयुक्त नाही. तुझी वांकडेतिकडे बसाल तर तिला आडकाठी होईल. ह्याकरितां तिला मोकळी असू द्या. केव्हाही छाती वांकवून ध्यानधारणेचा प्रयत्न कराल, तर शरीरास अपाय घडेल. छाती, मान व मस्तक हे शरीराचे तीन भाग, नेहमी ताठ-सरळरेषेत-धरले पाहिजेत. श्वासोच्छासक्रिया करण्याला जसें जड वाटत नाही, त्याप्रमाणे थोड्याच अभ्यासाने हेही तुमच्या आंगवळणी पडून जाईल. नंतर ज्ञानतंतूवर अंमल बसविणे ही दुसरी गोष्ट. श्वासोच्छासनियामक जें मध्यचक्र, ते इतर ज्ञानतंतंवरही आपली काही अंशी सत्ता चालवीत असते, हे आपणास कळून चुकलेच आहे. आणि ह्मणूनच प्राणायामामध्ये अवश्य नियमितपणा ठेवला पाहिजे. आपण नेहमीं जो श्वासोच्छ्वास करतो, त्यास मुळींच प्राणायाम असें ह्मणतां येत नाही. कारण, तो अगदीच अनियंत्रित असतो. आणखी, स्त्रिया व पुरुष ह्यांच्या श्वासोच्छ्रासामध्येही खा. भाविकपणेच भेद आहे. PA N ISESHI श्वास आत घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया प्रमाणांत चालविणे, हा पहिला धडा. असे केल्याने शरीरांतील झाडून सारी यंत्रे एका प्रमाणांत बसतील. कांहीं काल अभ्यास केल्यानंतर काही शब्द