या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जसें । ॐ' किंवा दुसरे असलेच पवित्र शब्द-ह्यांच्या नामावळीचाही त्यांतच परिपाठ ठेवावा.प्राणायामाबरोबर सुखरही खेळू लागला ह्मणजे सर्व शरीर आंतून व बाहेरून स्वरमय-किंवा नियमबद्धच होत चालल्याचे दिसून येईल. नंतर विश्रांति झणजे काय ते समजूं लागेल. झोपेची विश्रांति तिच्या पुढे कांहींच नव्हे. दमल्या भागलेल्या ज्ञानतंतूंना एकदां कां ही विश्रांति मिळाली, तर ते गाढ विश्रांतिसुखांतपूर्ण समाधींत-निमग्न होतील, आणि खरोखर विश्रांतिसुख ह्मणून जें काय ते ह्यापूर्वी आपण कधीच अनुभविलें नाहीं, असें तुह्मांस वाटेल. आह्मी हिंदुस्थानांत एक, दोन, तीन, चार, असे अंक मोजण्याएवजी कांहीं सांकेतिक शब्द योजित असतो. ॐ किंवा यासारख्याच दु. सऱ्या एखाद्या पवित्र शब्दाची नामावलि प्राणायामामध्ये मिश्रा करा, ह्मणून मी जें आपणांस सांगत आहे ते ह्याचकरितां. ह्या अभ्यासाने प्रथमतःच गुण दिसूं लागेल, तो हा की, मुद्रा फिरून जाईल. तोंडावरील ओबडधोबड रेषा नाहीशा होतील. असे शांतपणाने ध्यान केल्याच्या योगाने, शांतीची छटा ताडावरहा लागल. दुसरे असे की, मधुर स्वर प्राप्त होईल. ज्याचा आवाज कर्कश आहे, असा एकही योगी माझ्या कधीं अवलोकनांत आलेला नाही. थोड्याच दिवसांच्या अभ्यासाने ही चिन्हें दिसावयास लागतील. प्राणायामाचा थोडासा अभ्यास झाल्यानंतर, आपण त्याहून जरा उच्च प्रतीचा स्वीकार करावा. इडा झणजे डावी नाकपुडा, हीतून श्वास घेऊन फुप्पुसांची पुडें भरा; आणि ज्ञानतंतूंच्या प्रवाहावर मनाची एकाग्रता करा. जसे काय तुह्मी ज्ञानतंतंचा प्रवाह खालापाठीच्या कण्याकडेच पाठवीत आहां, आणि शेवटचा अगदी खालचा कंद-जें त्रिकोनाकृति मूलाधारचक्र जें कंडलिनीचें निवासस्थान, त्यास जोराने-गदगद गदगद-हालवीतच आहां, अशी कल्पना करा. नंतर तो प्रवाह काही वेळ तेथेच थांबवून धरा. तोच प्रवाह श्वासोच्छासाबरोबर तुझी हळू हळू, दुसऱ्या बाजूने ( उजव्या नाकपुडीतून ) ओढीत आहां, अशी भावना उत्पन्न करा. नंतर उजव्या नाकपुडीने तो हळू हळू बाहेर सोडून द्या. हा अभ्यास करावयाला तुह्मांस जरा १ ते शब्द-भूः-भुवः स्वः-मह:-जन:-तपः-सत्यं-हे होत.