या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आहे. त्याची व्याप्ती एकाच खंडांत नाही. तर युरोप खंडांतील अर्धा अधिक भाग व शिवाय एशिया खंडांतीलही अर्धा अधिक भाग त्याने व्यापलेला आहे. त्याचे उत्तर टोंक उत्तर ध्रुवाला व दक्षिण टोंक हिमालयाच्या एका टोकाला लागले आहे झटले तरी चालेल. ह्यामुळे त्या राष्ट्राच्या एका टोकाला दहा व चवदा तासांचे रात्रदिवस, आणि दुसऱ्या टोकाला दोन चार महिन्यांचे रात्रदिवस हा चमत्कार दृष्टीस पडतो. तसेंच एका टोकास रखरखित उन्हाळा व दुसऱ्या टोंकास इतकी थंडी की, समुद्राचे पाणी गोठून त्यावरून चालतां येते, व घरे बांधावयाची ती सुद्धां बर्फाची बांधावी लागतात ! मनुष्यांना वर्षानुवर्षे स्नानाचा प्रसंग येत नाही, व आयांना आपली मुले मांजराप्रमाण किंवा गायीप्रमाणं चाटून स्वच्छ करावी लागतात ! हेच त्यांचे न्हाणमाखण ! ह्या सर्व स्थित्यंतरावरूनच ह्या टोकाच्या लोकांमध्ये व त्या टोकाच्या लोकांमध्ये केवढे अंतर असेल ह्याचे अनुमान वाचकांनींच करावें. आज आमी ज्या लोकांचे वर्णन देणार आहों, ते लोक रशियाच्या उत्तर टोकास अर्थात् उत्तर समुद्राच्या जवळ राहणारे आहेत. ह्या लोकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन 'सामोय' ह्या नांवाचे तिकडे एक जातीचे ससे आहेत ते असल्यामुळे ह्या लोकांस 'सामोयिड' लोक असे ह्मणतात. अचांगलपासून पूर्वसैबिरांतील लेनापर्यंत ह्यांची वस्ती आहे. सामायिड लोक छातीकडून रुंद, अंगानें स्थूल, चपट्या चेहऱ्याचे, जाड ओठ, नाकपुड्या पसरट, दाढी अगदी थोडी, विरळ, परंतु लांब खरबरीत व केस काळे असे असतात. शरीराचा बांधा अगदी ठेंगू, परंतु मजबूत असून स्नायु तर अतिशयच भक्कम असतात. पुरुषांचा पोषाख ह्मणजे माथ्यावर रेनदीर नांवाच्या हरणाच्या कातड्याचा केसापवर्तमान एक उंच टोप; अंगांत एक तसाच डगला. त्याला अगसरी एक एक दोन दोन टांके दिलेले. कमरेला त्याच कात-- व्याचा एक कमरपट्टा. हातांत हातमोजेही त्याचेच. परंतु त्याला बोटे वगैरे बहुतकरून कांही नसतात. फक्त नुसत्या पिशव्या असायाच्या. पायांत तशाच रीतीचा चोळणा व खाली बुटासारखे जोडे. परतु मजबूत असूनस असतात. वरळ, परंतु लांब • उंच टोपार नावाच्या हरणा असतात. पुरुष