या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९, तुलखचे आत्मवृत्त; अल्लाउद्दीनची राज्यनीति; मराठ्यांची युद्ध करण्याची तव्हा; परदेशीयांची प्रवासवृत्तें इत्यादि भाग वाचले तर, कोणत्याही विद्यार्थ्याला आपण एखाद्या अभ्यासाची घोकंपट्टी करतो आहों असें न वाटतां, मुक्तामाला, मंजुघोषा, आरेबियन्नाइटसारखी एखादी कादंबरीच वाचित आहों असें वाटल्यावांचून कदापि राहणार नाही. तैमूरलंगाच्या नातवाच्या लग्नाचा थाट; जहांगिर, अकबर, व औरंगजेब ह्यांच्या अर्धकोटि मनुष्यांच्या (!) मनास थक्क करून टाकणाच्या स्वाया, इंग्रजांनी व इराणच्या वकिलाने बादशहास दिलेले नजरनजराणे, ह्यांच्या वैभवापुढें आरेबियन्नाइटांतील बिचाऱ्या अल्लाउद्दीनचा कल्पित इतमाम कांहींच नव्हे ! ह्या खऱ्याखुन्या इतिहाससागरापुढें आरेबियन्नाइटासारख्या मृगजलाचें तेज तें काय ? ग्रंथकारांची वर्णनशैली पहावयाला वर सांगितलेल्या वाऱ्या बस्स आहेत. जाताना का परंतु घडलेल्या गोष्टींचे कथन करणे ह्यांत विशेष तें काय ? इतिहासांतील गोष्टी पूर्वीच ठरलेल्या आहेत, मग ह्यांत अधिक तें काय केलें ? असें जर कोणी ह्मणेल तर त्याला वरचे बागेचेच उदाहरण पुरे आहे. वनस्पति, फळे, पुष्पं छाया. रंग, सुवास ही परमेश्वरनिर्मितच आहेत, तरी एक विशेष रीतीनें लावून, त्यांच्या परोपरीच्या रंगांची व आकारांची जनाच्या मनास आल्हादकारक रचना करणे ह्याला माळ्याचे चातुर्य लागत नाही काय ? तोच न्याय येथेही लागू आहे. तथापि झाडांची कलमें करणे, एकाच झाडाच्या निरनिराळ्या फांद्यांस निरनिराळी फुले व फलें आणणे हे चातुर्य त्याहूनही विशेष समजले पाहिजे. त्याप्रमाणे प्रस्तुत ग्रंथकाराचा विशेष बुद्धिमत्तेचा गुण सांगावयाचा राहिलेला पुढेच आहे. तो कोणता ? तर हरएक गोष्टीची किंवा स्थित्यंतराची कारणे सांगणे हा. उदाहरणः-मुसलमानांचे लक्ष्य हिंदुस्थानाकडे वेधण्यास कारणे काय काय झाली ? हिंदुस्थानावर स्वारी केल्यास आपणास जय मिळेल असा तर्क बांधण्यास कोणकोणत्या गोष्टी त्यांनी मनांत आणल्या ? त्या वेळेस हिंदुस्थानची स्थिति कशी होती ? अकबर येवढा राजकारणी व दूरदर्शी असतां, त्याच्या पश्चात् त्याच्या राज्याची कां बचबच झाली ? औरंगजेब इतकी जिवापाड मेहनत करीत असता, त्याचे तीन तेरा आणि पांच बारा कां झाले ? इत्यादि. हे सांगणे मात्र घडलेल्या गोष्टींचे कथन नव्हे. त्यास चांगलीच बुद्धिमत्ता पाहिजे. शिवाय, पाश्चात्य लोकांची विधाने जेथें चुकीची अशी वाटली तेथे तेथे त्यांचे सप्रमाण खंडन केले आहे. ग्रंथकार एके ठिकाणी ह्मणतात " इंग्रज