या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ग्रंथकारांनी आमच्या इतिहासाला एक प्रकारचे कायमचेच स्वरूप दिल्यासारखें केले आहे. ते मोडणे कठीण दिसते." तरी त्यांनी त्यास सत्य स्वरूप आणण्यासाठी आपल्याच्याने करवेल तितका प्रयत्न करण्यांत कांहीं कसूर केलेली नाही. ह्याशिवाय, ह्या इतिहासांत एक नवी तन्हा ग्रंथकारांनी सामील केली आहे, आणि ती फार उपयोगी आहे. प्रत्येक बादशहाची कारकीर्द समाप्त झाली ह्मणजे त्याच कालांत युरोपामध्ये कोणकोणाच्या कारकीर्दी होत्या, तेथील प्रत्येक राष्ट्राची स्थिति त्या वेळी कशी होती, तेथील सुधारणा कोणत्या थरावर हेलकावत होती, तिकडील राजाराण्यांचे व हिकडील राजाराण्यांचे स्वभावांत कितपत साम्य होतें इत्यादि विवेचनही त्यांनी फार मौजेचें केले आहे. पाश्चात्य इतिहासकारांनी व प्रवाश्यांनी केलेल्या भलभलत्या विधानांचे व अनुमानांचे माप, जागजागी त्यांनी त्यांच्या पदरांत घातले आहे. असो. BH02002 येथपर्यंत प्रस्तुत ग्रंथांतील ठोकळ ठोकळ गुण वाटले ते दाखल केले. आता दुसऱ्या बाजूकडे झणजे दोषांकडे वळावयाचे. येवढ्या मोठ्या व जबाबदारीच्या ग्रंथांत मनुष्यधर्माप्रमाणे काही चुका राहिल्या, तर त्यांत मोठेसें नवल नाही. तथापि, त्यांत अमक्या अक्षरावर अनुस्वारच नाही, अमका शब्द पुढे पडला आहे तो मागेच पाहिजे, असल्या क्षुल्लक बाबी काढून ग्रंथकाराच्या मनाचा विरस करणे, व आपल्या मनाचा संकचितपणा व्यक्त करणे हेही उचित नव्हे, तरी, ह्यापुढचे आणखी दोन भाग आह्मांपुढे यावयाचे आहेत, इतकेच नव्हे, तर दहा पंधरा वर्षांनी ईश्वरकृपा झाली तर. ह्या ग्रंथास काष्टमय सांगाडा करण्याचीही ग्रंथकारांनी उमेद बाळगिली आहे, त्या अर्थी त्यास योग्य ती सुधारणा करण्यास व विचार करण्यास संधि मिळावी ह्याकरितां दोषस्थळाचही दिग्दर्शन करणे अत्यंत इष्ट आहे. ह्यास्तव त्याचाही विचार करूं. _ ह्या ग्रंथांत प्रमुख दोष झटला झणजे 'मागचा पुढचा संदर्प सुटणे' किंवा परस्परविरोध दृष्टीस पडणे हा एक आहे. इतिहासासारख्या विस्तृत व भानगडीच्या विषयांत तसे होणे बरेंच साहजिक आहे खरें, तरी त्याविषयीं होता होईल तेवढी सावधगिरी ठेवली पाहिजे. खालचा लेख:-“पृथ्वीराजाच्या मृत्यूविषयीं एक चमत्कारिक गोष्ट चांदभाटाने आपल्या रासेंत लिहिली आहे. पृथ्वीराजास पकडल्यावर त्याचे डोळे काढून घोरीनें कैंदेत टाकिलें. त्याचा फार दिवसांचा सोबती चंदभाट हा आपला ग्रंथ लिहून प्रथ्वीराजाच्या शोधास गज्नीत गेला. त्या ठिकाणी मोठ्या कुशलतेने त्याने प्रत्यक्ष