या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. शहाबुद्दिनाचा खून पृथ्वीराजाकडून करविला. पृथ्वीराज केवळ शब्दवेधाने निशाण मारणारा होता. त्याचा हा खेळ पाहण्याविषयी चंदभाटाने शहाबुद्धिनाचे मन वळविले. शहाबुद्धिनाचे समोर खेळ चालला असतां तो 'शाबास' असे शब्द बोलला. त्या शब्दाच्या संधानावर पृथ्वीराजाने एकदम बाण मारून शहाबुद्दिनास ठार केलें. चंदभाट तेथें होताच. तो व पृथ्वीराज ह्यांनी एकमेकांस मारून घेतले. या गोष्टींत कितपत तथ्य आहे याचा निर्णय करता येत नाही." ह्यांत किती असंबद्धपणा उत्पन्न होतो पहा:-"पृथ्वीराजाच्या मृत्यूची गोष्ट चांदभाटाने आपल्या रासेंत लिहिली." "हा ग्रंथ लिहून तो त्याच्या शोधास गेला.” झणजे हा ग्रंथ पूर्वी लिहून तयार केला. चंदभाटाच्या आंगीं, राम होण्याच्या पूर्वी रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकाप्रमाणे अपूर्व शक्ति होती की काय ? नंतर "शहाबुद्दिनास ठार केले." "चंदभाट तेथें होताच." "तो व पृथ्वीराज ह्यांनी एकमेकांस मारून घेतले.” आधी एकमेकांस ठार मारावयाचें कसे ? हा प्रश्न उत्पन्न होतो. कारण, आधी एक मेल्यानंतर दुसऱ्यास मारावयाला त्याला शक्ति कोठची ? बरें; कल्पना केली की, मोठ्या शिताफीने एकमेकांनी मारून घेतले. तर मग ही हकीगत लिहून ठेवण्याला चंदभाटाला वेळ केव्हां मिळाला ? मरणोत्तर तर लिहिली नाहींना ? आपल्याच मरणाचे वृत्त लिहून ठेवणारा हा कवि लोकोत्तरच खरा! आतां एक मात्र कल्पना निघण्यासारखी आहे की, पुढील आपला बेत लिहून ठेवून आत्महत्या करणाराप्रमाणेच ह्यानेही आपला बेत सिद्धीस नेला असेल. पण 'तो त्याच्या शोधास गेला.' ह्या वाक्यावरून त्याचाही पुन्हा संशयच. कारण 'शोधास' निघाला ह्यावरून पृथ्वीराज कोठे आहे, कोणत्या स्थितीत आहे, शहाबुद्दिन कोण, ह्याचीही त्यास माहिती नव्हतीसी दिसते. मग सूड उगविण्याची तरतूद आधीच लावून काव्य कसें करील ? इतक्या विसंगत गोष्टी डोळ्यांपुढे असतां ग्रंथकार ह्मणतात "या गो. ष्टीत कितपत तथ्य आहे ह्याचा निर्णय होत नाही." खरोखरच मोठ्या भानग. डीचा खटला! त्याचा निर्णय करावयाला एखादा जज्ज किंवा बालिष्टर विलायतेहूनच बोलावला पाहिजे ! - वर सांगितलेला दोष घडण्याचे मुख्य कारण, प्रत्येक बादशहाच्या गुणांचें मनन करण्याकडे ग्रंथकाराचा कल विशेष आहे. पाश्चात्य ग्रंथकारांच्या लेखाचा झोंक असा आहे, की आपल्या अमलापूर्वी हिंदुस्थान देश अज्ञान व जुलूम ह्यांच्या अंधारकोठडीत जणों काय लोळत होता. त्यांनी प्रत्येक बादशहाला जु