या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. लमी, क्रूर व तुच्छ लेखिले आहे. राव. सरदेसाई ह्यांनी बादशाहीचा पक्ष घेऊन त्यांचे झणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्या आवेशांत तो अभिमान प्रमाणाच्या बाहेर जाऊन पूर्वापार लेखांतच विरोध उत्पन्न झाला आहे. पहाः – (पान ६१८): औरंगजेबाविषयीं ग्रंथकाराचें मतः " तरी धर्माच्या सबबीवर त्याने मुद्दाम कोणाचा जीव घेतल्याचं उदाहरण नाही." आतां हे कितपत खरे ह्याचा त्यांच्याच लेखावरून विचार करूं. "ह्या वेळी राणा राजसिंहाने पुढे होऊन बादशहास वाट करून दिली, व रजपुतविरील रोष सोडून देण्याबद्दल विनंती केली. परंतु ह्या उदार वर्तनाने औरंगजेब अधिक चिडला व सर्व गाईस ठार मारण्याचा हुकूम । आपण परत अजमिरास गेला. शाम पा० ६०१. हदू लोकास अत्यंत अपमानकारक गोष्ट झटली झणजे जिझिया' कर द्यावा लागण हा हाय. सर्व परधर्मी लोकांपासून हा कर मुसलमान अधिकारी वसूल असत. परंतु अकबरबादशहाने दूरवर दृष्टि पोंचवून हा कर माफ कला हाता. आरंगजेबार्ने कोत्या धर्मवेडाच्या भरीस पड़न सन १६७८ च्या रास हा कर पुनः सुरू केला. त्या वेळी सर्व लोकांत हाहाःकार उडाला. बादश हाकड दाद मागण्याकरितां लाखों लोक दिल्लीस राजवाड्यासमोर व रस्तोरस्ती जमा .. एका शुक्रवारी बादशहा मशिदीत जात असतां त्यांनी त्याचा रस्ता अडविला. तेव्हा त्यांच्या आंगावरून हत्ती नेऊन हजारों लोकांस बादशहाने ठार कल. "तेव्हा औरंगजेबाने मोठे लपकर जमा करून कडेकोट तयारीनिशा सा बराग्यावर हल्ला केला, व सर्वांची कत्तल करून टाकिली." पा० ५९८. 'यच्चयावत् गायींस ठार मारण्याचा हकम देणे, मोठे लष्कर जमा करून कडकोट तयारानिशी बैराग्यांवर हल्ला करून सर्वांची कत्तल करणे,' 'धर्मवेडाच्या भरीस पडून ' 'हजारों लोकांच्या आंगावरून हत्ती नेऊन त्यांस ठार मारणे,' ह्यांत 'धर्माच्या सबबीवर त्याने मुद्दाम कोणाचा जीव घेतल्याचे उदाहरण ' नाहींचना !! हो खरेंच, हत्तीला अंकुश मारला, तो मनुष्यांच्या देहावरून गेला, आणि त्याचे पाय जड असल्यामुळे, पदार्थविज्ञानशास्त्रधर्माप्रमाणे त्यांची हाड मोडून कोथळे बाहेर पडले, त्यास बादशहाचा उपाय काय ? मुद्दाम होऊन कोणाचाच जीव घेतलाच नाही ! हे सर्वही एका बाजूस राहो. पण आमच्या श्रीमच्छत्रपती संभाजीमहाराजांस 'मुसलमान हो ' ह्मणून सांगणार बादशहा सुमा