या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. आमचे पुचांडाळ - हाच; व त्यांनी ते नाकारले झणून त्यांचे डोळे काढून, जिव्हा छेदून हालहाल करून ठार मारणारा चांडाळ हाच ! ! ही गोष्ट आमचे पुत्रपौत्र सुद्धा कधी विसरणार नाहीत. असे असून त्या भ्रातृघातकी पितृघातकी कर्मचांडाळ बादशहाची आमच्या नूतन इतिहासशास्त्रज्ञ रावसाहेब सरदेसाई ह्यांनी 'धर्माच्या सबबीवर त्याने मुद्दाम कोणाचा जीव घेतल्याचे उदाहरण नाही ' ह्मणून उच्च स्वराने शेखी मिरवावी ना ! ! अरेरे! कोणत्याही विषयांत तल्लीनता व सरूपता प्राप्त झाली हाणजे अशा चमत्कारिक दोषांची उदाहरणेही कधी कधी घडलेली दृष्टोत्पत्तीस येतात, ती अशी, सेलिम ऊर्फ जहांगीर ह्या बादशहाच्या संबंधानेही असाच चमत्कार आहे. "जहांगीर कितीही वाईट, प्रबुद्ध व क्रूर असला, तरी पहिल्या जेम्सपेक्षां तो ज्यास्त तिरस्कारार्ह नाही."-पान. ५०९. " पाश्चात्य ग्रंथकार जहांगीर यास जुलमी व विलासी बादशहा असें ह्मणतात. परंतु सीझर नांवाचे जे रोमचे बादशहा झाले, त्यांहून जहांगीर ज्यास्त खुनशी, र किंवा जुलमी होता असे नाही. ह्मणून सीझराबद्दल पूज्यबुद्धि दाखविणाfi जहांगिरास नांवे ठेवण्याची जरूर नाही.” पान. ५०८. साल का "पविझ यास शहाजहानने विषप्रयोग केला असेंही कित्येकांचे ह्मणणे आहे. फ्रान्स देशांत यापुढे शंभर वर्षांनी चौदाव्या लुईच्या दरबारी विषप्रयोग पुष्कळ होत असत, ही गोष्ट लक्षात ठेवली ह्मणजे मोंगलांस विशेष नांवें ठेवण्याचे कारण नाही." पाश्चात्य ग्रंथकारांनी त्यांस जी नांवें ठेवली होती, त्यांस त्या कालची त्यांच्या देशाची स्थिति दाखवून देणे,-तुमच्या पायाखाली काय जळते आहे ते सांगणेंकिंवा त्यांची बोटें त्यांच्याच डोळ्यांत घालणे-हें एक परी उक्तच झाले. परंतु पुढची गंमत ऐका:-ह्या बादशहाविषयीं ग्रंथकाराचे स्वतःचे मतः " जाणूनबुजून तो वाईट कृत्य करीत नसे. विलास व लहर ह्यांच्या अंमलांत जे काय त्याच्या हातून घडे, त्याजबद्दल त्यास विशेष दोष देता येत नाही." पान ५०३. पण ह्याच पानांतील वरच्याच ओळींतील हकीगत ऐकाः “इराणच्या वकिलास मेजवानी देण्यात आली. त्या वेळेस बादशहाने जवळच्या सर्व मंडळीस दारू पिण्यास सांगितले. ...... खतः बादशहा इतका गुंग झाला होता की आपण दारू पिण्याचा हुकूम दिला, हे त्याच्या ध्यानांत राहिले नाही. दु