या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. सरे दिवशी दरबारांत कोणी एकानें आदल्या रात्री दारू प्यालाचा उल्लेख केला. बादशहा रागाने लाल झाला. ...... कित्येकांस जबर दंड केले. कित्येकांस भरदरबारांत चाबकांनी मारले; ह्या माराने कित्येक अगदी मरणोन्मुख होऊन पडले; तेव्हां जहांगिराने लोकांकडून त्यांस लाथांनी तुडविलें. एक इसम तर भर दरबारांत मरण पावला; बऱ्याच लोकांस तेथून उचलून न्यावे लागले. ...... गुन्हेगारांच्या तर्फेनें एक शब्द सुद्धा बोलण्याची कोणाची छाती नव्हती.” " ही गोष्ट मनास उद्वेग करणारी आहे खरी, पण तिजवरून बादशहाचा सद्धेतु चांगला व्यक्त होतो ह्यांत संशय नाही. (!)" पण हे काही 'जाणूनबुजून ' केलेले वाईट कृत्य नव्हे, राहो. ह्याच्या पुढचे तरी:TE "जहांगीरच्या स्वभावांत क्रौर्य असल्यामुळे क्षुल्लक अपराधास कित्येक वेळी कडक व तन्हेवाईक शिक्षा करण्यांत येत. एकदा त्याने आपल्या पुतण्यास सिंहाच्या तों. डावर हात ठेवण्यास सांगितले. तें त्याने केले नाही, ह्मणून त्यास जन्मभर आंधारकोठडीत कोंडून ठेविलें. नूरजाहानच्या एका दासीनें यःकश्चित् चुकी केली, ह्मणून त्याने तिला जमिनींत गळ्यापर्यंत पुरले. तेथें तीन दिवस व दोन रात्रीपर्यंत ती जगल्यास तिला माफी द्यावयाची होती. पण ती इतका वेळ जगली नाही. एकदा शभर रामोशी धरून बादशहासमोर आणले. त्याच्या मुख्यास त्याने कुत्र्याकडून खावविल. तेरा असामींची डोकी उडविली; बाकीच्यांच्या टोळ्या करून त्यांस अजमीरच्या निरनिराळ्या रस्त्यांवर ठार मारिलें.” हीही 'जाणूनबुजून ' केलेली वाईट कृत्ये नव्हेतच ना! बरें; पुढेः-बादशहा स्वतः आपले शौर्य व पराक्रम सांगतो: " तीस हजार बंडवाले मारले गेले. दहा हजारांची शिरें दिल्लीस आणली. मोठमोठ्या रस्त्यांवरून दहा हजार लोकांस झाडांवर उलटे टांगलें." " जहांगिराने त्याच्या (मुलाच्या) साथीदारांस पकडून अत्यंत क्रूर शिक्षा दिल्या. शेकडों लोकांस हत्तींच्या पायांखाली देऊन, व जिवंत सोलून, आणि नदीत बुडवून ठार मारले. ७०० लोकांस दरवाजाबाहेर सुळांची रांग उभी करून त्यांजवर चढविले." पान-५१४. ही तर 'जाणूनबुजून ' केलेली वाईट कृत्ये नव्हेतच. पण खालच्या दोनच ओळी लक्ष्यपूर्वक वाचण्याविषयी आमची विनंती आहे: "हत्तींच्या पायांखाली लोकांस तुडवून जहांगीर मजा पहात स्वस्थ बसे. वाघाची व निःशस्त्र मनुष्याची झोंबी लावी." पान-५०५