या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक २ रा. फेब्रुवारी १८९९. हीही जर ' जाणूनबुजून केलेली वाईट कृत्ये ' नसतील, तर त्यांची व्याख्या काय, ती तरी कृपा करून राव. सरदेसाई आह्मांस कळवितील, तर त्यांचे आझी अत्यंत उतराई होऊ. आतां तयमुलेगाचा मासलाः"तेव्हां तर तयमूरच्या लोकांनी एकसारखा शहरांत रक्तपात चालविला. रस्त्यांतून जाण्यास मार्ग नाही इतक्या प्रेतांच्या राशी सर्व शहरभर पसरल्या. RT पान १३४. "इतरांचा जीव घेऊन त्यांच्या शिरांचा एक मोठा ढीग शहराबाहेर रच. ण्यांत येई. बगदाद शहर घेतले त्या वेळेस अशा शिरांचे मनोरे १२१ झाले होत ! ! केव्हां केव्हां जिवंत माणसांस चुन्यांत चिनून त्यांचा तट बांधण्याचे काम तयमूरचे कुशल कारागीर करीत. ही त्याची कृत्ये; आणि 'तयमूर फार कोमळ अंतःकरणाचा होता, है ग्रथकारांनी त्यास दिलेलें सर्टिफिकीट !! पूर्वापार विरोध झणजे काय, हे प्रस्तुत ग्रंथकारांच्या गांवींच नाही असे दिसते. शेदोनशे किंवा पांचचार पान सुद्धा अवकाश त्यांस लागत नाही. पुढचेंच वाक्य विरुद्ध रूपाने आले तरा ते त्यांस खुशाल चालते. खालच्या दोन वाक्याची मौज पहाना ? ही तयमूरविषयींच आहेत: "त्याची कुटुंबांतील माणसांवर फारच प्रीति असे." पान-१४० आणखी त्याच्या पुढचंच वाक्य हैं: " तरी मुलांवर त्याची शिक्षा फार कडक होती. अनेक प्रसंगी यःकश्चित गुलामांप्रमाणे तो त्यांस वागवी." जणों काय फारच प्रीति फार कडक' ' यःकश्चित् गुलाम' ह्या शब्दांत फरक ह्मणून कांहीं नाहींच, असो. आतां ह्यापुढे साधारण सर्व दोष वगैरे काय काय व कोणत्या सुधारणा करणे अवश्य वाटतात, त्या संबंधाने सर्व साधारणच सांगू या. ग्रंथकारांनी आपल्या प्रस्तावनेत आपल्या भाषेसंबंधी पुष्कळ मजकूर कीव येण्यासारखा लिहिला आहे. व शेवटी ' तें कसब माझ्या आंगीं नाही, तेव्हां रडून तरी काय उपयोग ?' इतके सुद्धां उद्गार काढले आहेत. पण तितकी कांही त्यांची भाषा दुर्बोध वगैरे नाही, हे आह्मी बेलाशक सांगतो. तथापि अशी कोठे कोठे स्थळे सांपडतात, की त्यांतील वाक्यांचा अर्थ कळत नाही, व