या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. रोखही समजत नाही. शब्दयोजनेंतही कित्येक वेळ हास्यास्पद चुका होतात. ह्यास्तव ह्यांतील थोडा तरी मासला, त्यांच्या कानावर घालणे आमचे कर्तव्य होय. खालील चुकी किती विलक्षण आहे पहा: "अनेक पदें व इतर कवनें तुळसीदासाने लिहिलेली आहेत. त्याने बांधिलेले सीतारामाचे देऊळ व मठ अद्यापि बनारस येथे आहेत. तुळसीदास सन १६२४ त मरण पावला. ह्यावरून शहाजहान बादशहाशी त्याचा संयोग (!!) झाला असेल असें संभवत नाही.” पान ६८८. संयोग' ह्या शब्दाने ह्या वाक्यांत केवढी घाण व उपहास्यता करून सोडली आहे, हे ग्रंथकारांच्या समजुतींत आले नाही, तरी आमच्या वाचकांच्या सहज लक्ष्यांत येईल. 'भेट झाली असेल ' ' भेटीचा योग आला असेल' असे काही शब्द पाहिजे होते. ही चूक केवळ अक्षम्य होय. इतरही भाषेसंबंधी अल्पस्वल्प दोष सांपडतात. खालचे वाक्यः " त्यांचा जनानखाना मोठा असन लग्न व संतति ह्यांजविषयों सक्तीचे नियम समाजांत मानले जात नसल्यामळे वाढ खुंटत नस." पान, ६६४. ह्या वाक्याचा रोख कशावर आहे, व अर्थ काय हे काहीच कळत नाही. " स्वतः दिल्लीचे तक्त मग बळकावलें !" पान ११२. ह्यामध्ये 'मग' हा शब्द भलत्याच ठिकाणी पडल्यामुळे वाक्याची अगदीच दुर्दशा उडाली. "चार हिंदुस्थानदेश होतील इतका विस्तार त्याचे राज्याचा झाला." पान ७३ ह्या वाक्याचा नमुना आणि उंटाच्या मानेचा नमुना एकच ! यापेक्षाः "त्याच्या राज्याचा विस्तार इतका झाला, की हिंदुस्थानदेश चार होतील. असें वाक्य केले असते तर सरळ झाले असते. (पढ़े चालू.) यश PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.