या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

M22-CLI अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २४३ कमरेपासून गुडघ्यापर्यंत लिंब नेसल्याप्रमाणे किंवा कलावंतिणी झगा घालतात त्याप्रमाणे लांब लांब केसांच्या चामड्यांच्या तुकड्यांची झालर. बायकांच्या पोषाखामध्ये बरीच इष्की असते. इष्की झणजे येवढीच की, त्यांच्या पोषाखांतील चामड्यांचे तुकडे रंगारंगांचे शिवलेले असल्यामुळे, आमच्या हिकडच्या कुणब्याच्या वाकळीप्रमाणे दिसतात. त्यांच्या मस्तकावरचे आच्छादन आमच्या हिकडील कानटोपीप्रमाणे किंवा मुलाच्या टोपऱ्याप्रमाणे असते. त्या आपल्या केसांची वेणी घालून ती पाठीवर मोकळी सोडतात, व तिच्या शेवटाला गोंडे फुलें घातल्याप्रमाणे केसांचे झुबके असलेले चामड्याचे तुकडे व शिंपा वगैरे बांधतात. येवढेच नव्हे, तर त्या वेणीला आणखी कितीएक प्राण्यांची लांबच लांब शेपटें गांठवून तेही पदर मोकळे सोडतात. किंवा एखाद्या तरुणीला थोडासा नखरा ह्मणून करावासा वाटला तर ती सर्व. शेपटें ती मुरडून आणून छातीवर सोडते! आणि तिचे अंग हिकडे तिकडे हालूं लागलें झणजे त्यांतील शिपांचा खुळु खुळ ध्वनी निर्धू लागला ह्मणजे त्यांतील चैनी मंडळी अगदी खुष ! जणों काय, गजगामिनीच्या चरणांतील नूपुरेंच रुणझुणत आहेत! ह्या लोकांना स्थायिक घरदार बांधून राहण्याचे कधीं माहीतच नाही. डोंबाऱ्याप्रमाणे ह्यांचे बिहाड सदानकदा पाठीवर. दहा पांच काठ्या आणि रेनदीरची चामडी वगैरे शिवून तयार केलेल्या पालपट्ट्या. हे ह्यांचे घर, ह्या घरांत निजावयाला प्रत्येक मनुष्याला एक खाटले व पांघरावयाला एक चामडे असते. . चार काठ्यांना चामड्याची चार टोंके गुंतवलेली हे खाटल्याचे खरूप! प्रत्येकाचा बसावयाचा ओटा, निजावयाचा पलंग सारें कायतें तेंच. डोंबान्यांची जशी गाढवें आणि डकरें, तशी ह्यांची रेनदीर व कुत्री ही जनावरें. पाण्याच्या फेंसाप्रमाणे 'स्त्रो' ह्या नांवाचा बर्फ तिकडे नेहेमी पडलेला असतो, आणि त्याने सर्व जमीन आच्छादून जाते. त्यांच्यावरून जाण्यासाठी त्यांनी एक प्रकारच्या लांबट आकाराच्या टोपल्या केलेल्या असतात. त्यांत बसून त्याला रेनदीर किंवा पांच सहा कुत्रे जोडतात. ह्मणजे ती टोपली त्या सुळसुळीत बर्फावरून भरारा निसरत जाते. ही त्यांची वाहने व प्रवासाची तन्हा.