या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १३] ३ समुद्रसर्प. ज्यांनी ज्यांनी महासागराची व त्यांतील प्राण्यांची वर्णनें वाचलेली आहेत, त्यांची त्यांची बहुधा आजपर्यंत अशीच खात्री असणार की, समुद्रात सर्वात मोठा प्रचंड-केवळ अजस्र-असा प्राणी एक देवमासाच होय. किंवा त्याच्या जवळ जवळ फार तर तंतु हाही एक विशाळ व भयंकर प्राणी आहे. परंतु समुद्रसपांची वर्णनें ऐकिलीं ह्मणजे वर सांगितलेल्या दोन प्राण्यांची कांहींच मातब्बरी नाही असे दिसून येईल. अशा त्या अद्भुत व राक्षसी प्राण्याचे आज थोडक्यांत सचित्र वर्णन देत आहों. खाऱ्या पाण्यात किंवा समुद्रात राहणारे जे लहान लहान सर्प असतात, त्यांना 'पानसाप' असें ह्मणतात. हे पानसाप समुद्रकिनायावरील प्रत्येक बंदरावर अनेक आढळण्यांत येतात. ह्या पानसापांची साधारणपणे ७८ फूट लांबी असून हाताच्या मनगटाएवढी