या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जाडी असते. कोचींतील खाडींत कोळ्यांच्या जाळ्यांत किंवा गळाला लागून आलेले पानसाप पुष्कळ दृष्टीस पडतात. परंतु ह्याहून मोठा कोठे आढळण्यांत आलेला नाही. गलबतांतून वगैरे ह्याच देशांतील निरनिराळ्या बंदरीं जातांना समुद्राच्या मध्येही पानसाप दृष्टीस पडतात. परंतु त्यांचाही आकार ह्याहून फारसा मोठा असल्याचे ऐकिवात नाही. पण अशी जलचरांची वर्णने सांगण्याची व ऐकण्याची तरी आमच्या लोकांस अभिरुचि कोठे आहे ? पाश्चात्य देशांतील लोकास प्रत्यक शास्त्रांतील शोधाची अभिरुचि असल्याकारणाने प्राणिशास्त्राची माहतीही त्यांनी बऱ्याच प्राचीनकालापासून मिळविलेली आहे. आणि ता पुष्कळ अंशाने विश्वसनीय असण्याचा संभव आहे. हे प्राणी झटले मणजे द्वीपांतरास सफरी करणारे जे मोठमोठे दर्यावदी असतील त्या च्याच दृष्टीस पडावयाचे. तेव्हां अर्थात त्यांचे लेख हाच या श्रा ण्याच्या वर्णनाचा मूळ पाया होय. तथापि ही समुद्रसपाची साधारण लहान जात सर्वत्र असल्याने प्रथमतः त्याची साधारण माहिती देऊन नंतर अद्भुत प्राणी दृष्टीस पडल्याचे लेख देऊ. युरोपचा उत्तरभाग, मणजे नार्वे देश वगैरे हे समुद्रसर्पाचे मुख्य वसतिस्थान होय. येथील समुद्रसर्पाची लांबी ८० पासून १०° 3 पर्यत असते. तो समुद्रामध्ये मस्तक उंच काढून उसळ्या घेत घत पोहत असतो. ह्याच्या मानेपाशी दोन बाजंस दोन पंख असतात. त्यांच्या सहाय्याने समुद्रामध्ये तो अतिशय वेगाने धांवत सुटतो. जमिनीवरील सपाप्रमाणेच समुद्रसर्पालाही कात टाकावी लागते. कापरविग ह्मणून नावं देशांत एक मोठे शहर आहे. तेथें समुद्रसपांच्या कातीचा मोठा व्यापार चालतो. ह्या कांतीची टेबलावर टाकण्याची आच्छादने, मच्छरदाण्या वगैरे उत्तम होतात. ह्या कांतींमध्ये दोन प्रकार असतात. एका जातीच्या कांती मृदु व तुळतुळीत असतात; आणि दसया जातीच्या कांती खवलेवजा-जाळीदार किंवा नकशीदार अ. सतात. समुद्रसपांच्या पाठीवर मोठे आयाळ लोंबत असते. त्याचे तोले मोठे बटबटीत असून अतिशय तेजस्वी असतात. त्याच्या मस्तकाचा आकार घोड्याच्या तोंडासारखा दिसतो. कित्येक दर्यावर्यांनी असे वर्णन केले आहे की, त्याच्या तोंडाच्या वरच्या बाजूस नाकपुड्या