या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. " इ० स० १७४६ तील आगष्ट महिन्याच्या अखेर ट्रादिमच्या सफरीहुन मी परत येत असतां, शांत हवेमध्ये मोल्डबंदरी नांगर टाकण्याच्या बेतांत होतो. किनारा सुमारे ६ सांखळ्या लांब होता. मी एक पु. स्तक वाचित बसलो होतो. इतक्यांत खलाशी लोकांमध्ये काही गडबड सुरू झालेली माझ्या कानावर आली. तेव्हां मी काय आहे ह्मणून चौकशी केली. तो सांगों लागले की, एक समुद्रसर्प आपणांकडे चालून येत आहे. ज्या प्राण्याविषयी मी अनेक गोष्टी ऐकत आलो होतो, तो अद्भुत प्राणी प्रत्यक्ष पहाण्याचा प्रसंग आल्यावर व्यर्थ कसा दवडतां येईल? मी त्यास नीट न्याहाळून पहाण्यासाठी पाण्यात बोट सोडा ह्मणन हकमही केला. व त्याप्रमाणे सार तयारीतही होते. पण तो सर्प थेट आमच्याकडेच रोख धरून आह्मांवरच चालून आला, व तो आतां आझांवर खास हल्ला करणार असें दृष्टीस पडले, तेव्हां मा लागलीच माझी भरलेली बंदक होती ती घेतली आणि त्याच्यावर झाडली. त्याबरोबर तो बुडाला आणि पुन्हा दिसला नाही. तो जेथे बुडाला त्या ठिकाणच. पाणी लाल दिसत होते. त्याचे मस्तक अतिशय उभे, लाटेपेक्षाही दोन फूट उंच असून ते घोड्यासारखे दिसे. त्याच्या शरीराचा रंग करडा असून तोंडाजवळ पिगट होता. डोळे काळे असून त्याच्या मानेभोंवतीं आयाळ पसरली होती. तो समुद्रावर नागमोडी आकाराने पसरलेला होता. आणि त्याच्या शरीराची सात आठ वेटाळी स्पष्टपणे ओळखू येत होती. ती मोठी अवजड असून प्र. त्येकामध्ये सहा सहा फुटींच्या अदमासाने अंतर दिसत होते. हा सर्व लेख आ. पण मागितल्यावरून मी देत आहे व ज्या दोन खलाशांनी माझ्याबरोबरच प्रत्यक्ष ही गोष्ट पाहिली, ते-निकोलस पव्ही अर सन कूपर आणि निकालस ऑग्लो वीवन-ह्यांच्याही सह्या घेतल्या आहेत, व ते उभयतां शपथेवर सांगण्यासही तयार आहेत." नया एल्. डी. फेरी. फेरी हा बुद्धिमान् दिसतो; व त्याच्या सांगण्यांत संदिग्धपणा अ. साही काही नाही. इतर दर्यावर्दी लोकांनी जी जी समुद्रसर्पाची वर्णने केलेली आहेत, त्यासच जुळून हेही आहे. मिस्तर म्यॉक्लीन ह्मणून एक धर्माध्यक्ष होता. त्यानेही एक प्राणिशास्त्रशोधक मंडळीला पत्र पाठविले आहे. तेही काही कमी महत्वाचे आहे असें नाहीं. हे पत्र त्याने हिवाइडसू येथून लिहिलेले आहे. ते खरोखर फार आश्चर्य