या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__अंक ३ रा. मार्च १८९९. वाटण्यासारखे आहे. त्यांतील प्रत्येक वाक्यावरून त्याची कशी घाबरगुंडी उडाली होती, त्याची चांगली साक्ष पटते. आणि त्याच्या आठवणीने पत्र लिहितांना सुद्धा ह्या बुवाजींचे हात कांपत होते असें दिसत. आणि ज्या खलाशाने हे 'बशीयेवढ्या ' डोळ्याचे धूड पाहिले, त्याच तोडीचे ह्याचेही भय होते असे दिसते. ते पत्र हैं: " महाराज ! आपलें एक तारखेचे पत्र पोंचलें. ह्याकरितां आतां दुसऱ्या तिसऱ्या गोष्टींचा पाल्हाळ न करितां, आपण ज्या विवक्षित प्राण्याची हकीगत विचारली, त्याचीच हकीगत लिहितों. इ. स. १८०८ तील जून महिन्यामध्ये समुद्रांत 'समुद्रसर्प' हा प्रचंड प्राणी मी 'कॉल'च्या किनाऱ्यावर पाहिल्याची मला पक्की आठवण आहे. मी एका बोटीत बसून चाललो होतो. इतक्यांत सुमार अर्ध मैलावरून काही एक जगड्वाळ पदार्थ दिसू लागला; व आह्मी जसजसे त्याच्या जवळ जवळ जाऊं लागलों, तसतसे आमचे आश्चर्य दुणावत चालले. प्रथमतः मला तें लहानसें खडपच असावे असे वाटले, परंतु त्या ठिकाणी खडप असण्याचा संभव नाही असे समजल्यावरून आही त्याच्याकडे विशेष लक्ष्य लावून पाहूं लागलो. पुढे पुढे तर तें समुद्राच्या सपाटीवर फार फारच उंच येऊ लागले. थोडीशी हालचाल झाल्यानंतर त्याचा आझांला एक . डोळा दिसू लागला. त्या प्राण्याची ती अद्भुत व जगड्वाळ आकृति पाहून मी एकदम आरोळी ठोकली. आणि माझ्या बोटीवरच्या लोकांना किनाऱ्यास लावा किनाऱ्यास लावा ' ह्मणून घाई केली. इतक्यांत तें धूड आमच्या बोटीचीच शिस्त धरून बुडालेले आमच्या दृष्टीस पडले. तेव्हां तर आमच्या का. ळजाने अगदी ठाव सोडला. आमचे लोक अगदी जीव तोडून वल्हवित होते. जेमतेम जीव घेऊन एकदांचे तडीस लागलों, उड्या टाकल्या आणि झपाझप एका उंच खडकावर चढलों मात्र, तोंच ही स्वारी पाण्यांतून आमच्या बोटीहून उंच उभी राहिली, आमची होडी हालवून पाहिली, व शिकार गेली ह्या त्वेषाने थोडीशी अदळआपट करून दहा पंधरा मिनिटांतच परत फिरली. त्या सपाट्यामध्ये जे पाणी उसळत होतें तें, देवमाशाच्या फवाऱ्याहूनही उंच होते. जातांना हा सर्प अमळशा खोल पाण्यांत जाऊन एकदां खूप ताठ-उंच-असा राहिला, आपल्याच आंगाभोंवतीं गरगर गरगर फिरला, आणि ज्या खाडीच्या तोंडांतून आंत आला होता, त्याच तोंडांतून बाहेर पडून चालता झाला. अर्धा मैलपर्यंत आझांस दिसत होता. त्याचे मस्तक प्रचंड असून त्याचा आकार. दीर्घ वर्तुळ