या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. होता. त्याच्या खांद्यापाशी पंख वगैरे काहीएक नव्हते. त्याचा आकार शेपटाकडे निमुळता होत गेला होता, पण तो स्पष्टपणे पहावयास मिळाला नाही. कारण, तो प्राणी वारंवार पाण्यात बुडत असे. त्याची लांबी साधारणपणे ७० पासून ८० फूटपर्यंत असावी. त्याचे तोंड सरळ वर उभे असल्यामुळे तो पुष्कळ अंतरावरून सहज दिसे. मला - ह्याच सुमाराला कान्ना बेटाशेजारीही समुद्रसर्प आढळण्यांत आला होता. तेथे मच्छिमाऱ्यांच्या तेरा होड्या त्याने अडवून धरल्या होत्या. त्यांना बराच वेळपर्यंत खाडीत जातां येईना. ह्या होड्या व कान्ना बेट ह्यांच्यामध्ये हे राक्षसी समुद्रसपाचे धूड असून त्याचे मस्तक पाण्यावर उभारलेले होते. त्यांतील एका मच्छिमाऱ्याने खात्रीपूर्वक सांगितले की, त्या सर्पाचें मस्तक एका लहानशा पिपायेवढे होते. आणि डोळे (बशी) तबकडीसारखे दिसत. इतकी आश्चर्यकारक व रमणीय हकीकत कोणास पहावयास किंवा ऐकावयास आजपर्यंत मिळाली असेल असें वाटत नाही." विहानाल्ड म्यॉकीन. ह्यानंतर काही महिन्यांनी आनी बेटांतील स्टांझे" च्या कि. नाऱ्यावर, हेबीड्सजवळ एक मोठा समुद्रसर्प दृष्टीस पडला. तो पहाण्यासाठा शराफ, सरकारी कामदार, डाक्टर ब्लार्के वगैरे शास्त्रवेत्ते पुरुषही आले होते. त्यांनी त्याचे वर्णन लिहन ठेवले आहे. त्यांत "त्याची लांबी ५६ फूट असन, १० फूट घेर असून शिवाय, त्याच्या गळ्याच्या खालपासून तीन फूट शेपूट राहीपर्यंत राठ केसांची आयाळ लोंबत होती. आयाळाचे तंतु फासफरसयुक्त असल्यामुळे रात्री प्रकाशमान दिसत. त्याच्या दोहों बाजूस दोन पंख असून त्यांची लांबी चार फूट होती. हे पंख बदकाच्या उपटून काढलेल्या पंखांप्रमाणे दिसत." समुद्रसपाच्या माहितीचा सरकारी नात्याने पहिला कागद हाच होय. ह्याशिवाय कित्येक नामांकित पानबुड्यांनीही माहिती लिहून ठेवलेली आहे. परंतु अमेरिकेमध्ये ह्या प्राण्याची माहिती मिळविलेली अधिक विश्वसनीय आहे. ती अशी: इ० स० १८१७ च्या आगष्ट महिन्यांत यूनाइट स्टेट्सयेथील प्राणि त्यामुळे राळ लोवत होलालपासून तीन