या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १९९९. शास्त्रशोधक मंडळीच्या, ग्लासेस्टरच्या उपसागरांत बोस्टनशहरापासून ३६ मैलांवर एक विलक्षण व प्रचंड जलचर बऱ्याच लोकांस दृष्टीस पडत असल्याचे कानावर आले. साधारण लक्षणांवरून तो प्राणी सर्प असावा, असा तर्क बांधलेला होता. लोकांच्या सांगण्यांत तो पाण्यामध्ये अतिशय वेगाने पोहतो. ह्याच्या अंगाची वेटाळी एकामागे एक पिपांची मालिका लावल्याप्रमाणे पाण्यांत फिरत असतात. भर उन्हांत कोळी लोकांनी हे धूड पाहिले की ते अगदी भेदरून जाऊन त्यांची केवळ गाळण होऊन जाते. ह्या वदंतेमध्ये कितपत तथ्य आहे, ते प्र. त्यक्ष पाहून, त्या प्राण्याचा आणखी करवेल तितका शोध करून रिपोट करण्याविषयीं वर सांगितलेल्या मंडळीनें एक कमेटी नेमली. त्या कमटीने विविक्षित ठिकाणावर जाऊन आपलें ठाणे दिले. त्यांतील माहिता पडताळून पहाण्यासाठी ह्या कमेटींत अनेक साक्षीदार नेमून ठेवलेले होते. चाहा रिपोर्ट ऐकण्यासाठी सारी अमेरिका उत्सुक होऊन राहिली होती. निरनिराळ्या साक्षीदारांची मते कशी काय पटतात हे पहाण्याकडे सर्व लोकांचे डोळे लागून राहिले होते. अखेर तो रिपोर्ट प्रसिद्ध झाला. त्यांतील सारांश असाः-- मायामानाज एकाने हा सर्प लांब असतांना दुर्बिणींतून पाहिला, व त्याच्या शरीराचे आठ भाग-वेटाळी त्याने मोजली. व तो प्राणी उंच उभा राहून हेलकावे खात असल्याचे सांगितले. दुसऱ्या एकानें तो १० आगष्ट रोजी लाटांवर तरंगतांना पाहिला. त्याचा रंग गर्द तपकिरी असून लांबी ६० फूट होती. तिसऱ्या साक्षीदाराचे ह्मणणे त्याचे मस्तक महांडुळासारखें असून ते घोड्याच्या मस्तकायेवढे मोठे होते. आणि शरीराची लांबी तब्बल १०० फूट होती. सर्व साक्षीदारांनी सांगितलेली लांबी ह्या दोन लांबींच्या आंकड्यांच्या दरम्यान होती. कित्येकांनी जबडा पसरलेला पाहिल्याचे लिहिले आहे. जमिनीवरच्या सर्पाच्या चालीप्रमाणेच त्याची पोहण्याची ढब कधी वेगाने व कधीं मंद असे. त्याची गति नेहेमी सरळ रेषेत असे. कधी कधी तो आपलें मस्तक पाण्याच्या सपाटीवर चार फुटांहूनही उंच उभारी. ता० १४ व २८ ह्या दिवशी त्याजवर कितीएक बंदुका झाडण्यांत आल्या. प्रत्येक बाराबरोबर तो आपल्या