या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. त्याची माहिती क्याप्टन सांगतातः-"हा सर्प केवळ राक्षसी होता. त्याचे मस्तक व खांदे समुद्राच्या सपाटीवर सुमारे चार फूट उंच होते. जो भाग पाण्यावर दिसला, तेवढा ६० फुटींच्या अदमासाने होता. बाकीचा पाण्यांत असल्यामुळे दिसला नाही. हे जनावर जहाजाच्या इतके जवळ आले होते की, आमां प्रत्येकास ते नीट न्याहाळून पहावयास मिळाले. दुर्बिणीसारख्या कोणत्याही साधनाची गरज नव्हती." दुसरे उदाहरण. त्यानंतर वीस वर्षांनी एका प्रसिद्ध लिव्हरपूलच्या एका गलबताच्या मालकाचें. ह्याने असे लिहून दिले आहे:"ग्यालव्हेस्टनला पोंचावयाच्या पूर्वी दोन दिवस, सन १८७२ मे ता० १३ ह्या दिवशी दुपारी चार वाजतां हवा स्वच्छ असून समुद्र शात होता. इतक्यांत गलबताच्या मागच्या बाजूस कांहीं नक मोठमाठ्यांनी उड्या मारूं लागले व त्यांपैकी एक दोन डेकवरही येऊन पडले. ह्यास सुमारे दोन मिनिटे झाली असतील नसतील तों, सारे खलाशी आरडाओरड करूं लागले. कोणी ह्मणे उंच माणसासारखें कायसेंसें समुद्रांतून वर येत आहे. तेव्हां आमी सारेच त्याच्याकडे न्याहाळून पाहूं लागलों. तो जवळ आला तेव्हां एक अजस्र सर्प असल्याचे दृष्टोत्पत्तीस आले. त्याचे मस्तक गलबतापासून सुमारे २०० फुटांवर होते. तो आपले मस्तक पाण्यावर उंच करून जमिनीवरील सपोप्रमाणे आपले शरीर नागमोडी आकाराने हालवित असे. त्याचे सर्व शरीर कांहीं आझांस दिसले नाही. पण जेवढा भाग दिसला, तेवव्याची लांबी ७० फुटी असावी. त्याच्या पाठीवर पांच पंख होते. शरीराचा रंग पिवळसर हिरवा असून पोटाखाली पांढरा होता. आमी सारे जहाजावरचे लोक त्यास सुमारे दहा मिनिटें पहात होतो. त्याचा घेर अदमासे सहा फुटांचा होता. आमच्यापैकी एका खलाशाने त्याचे साधारण चित्रही काढून घेतले आहे." लिव्हरपूलच्या पोलिसकोटीत पोलाईन नांवाच्या गलबतावरील एक क्याप्टन व पांच खलाशी, ह्यांची शपथेवर साक्ष झालेली आहे. तीत "इ. स. १८७५ जुलईच्या ८ व्या तारखेस आमी तीन मोठमोठाले देवमासे पाहिले. आणि त्यांपैकी एकाच्या भोंवतीं एका मोठ्या समुद्रसर्पाचे दोन वेढे होते ! ते वेढे खेरीज करून त्या सर्पाच्या तोंडा