या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. कडची व शेपटाकडची लांबी सुमारे ३० फूट होती. आणि शरीराचा घेर आठ किंवा नऊ फूट होता. तो सर्प सुमारे १५ मिनिटें त्या देवमाशाच्या सभोंवतीं गिरक्या खात होता. नंतर एकदम त्याने त्या देवमाशाचे तोंड खाली बुडवून त्यास तळाशी नेले." असा लेख आहे. अशाच प्रकारें लेफ्टनेंट हेन्स ह्याने इ. स. १८७७ च्या जूनमध्ये सिसिलीच्या किनाऱ्यावर एक सर्प पाहिला होता. तो ह्मणतो "आमच्या गलबतापासून सुमारे २०० यार्ड अंतरावर पाण्याच्या सपाटीवर पुलास बसविलेल्या दगडाप्रमाणे किंवा कर्वताच्या दांतांप्रमाणे पंखांची ओळच्या ओळ दिसू लागली. ही पंखें संपूर्ण दहा व एक अर्धे इतकी दिसत होती. त्यांची उंची कमजास्ती होती. त्या प्रत्येकीमध्ये तीस पासून चाळीस फुटांचे सुमारें अंतर होते. थोड्याच वेळात हा सर्व नाहीसे होऊन त्या जनावराचा पुढचा प्रचंड भाग दिसू लागला. मस्तक वाटोळे घागरीसारखे असून त्याच्या खाली पधरावा. हात. त्याने तो पाणी वल्हवीत असल्याचे स्पष्ट दिस. त्याचे सबंध शरीर आह्मांस दिसले नाही. मधून मधून काहा भाग दिसे. तेवढ्याची लांबी ५० फूट होती. हा त्याच्या सर राचा असावा असा आमचा तर्क आहे. त्याचे सर्व जगत माशासारखें तुळतुळीत होते." या माहितीतील ही कांहीं ठोकळ ठोकळ वर्णने दिली आहत. यावरूनच खऱ्या खोट्याचा काय तो तर्क बांधावयाचा. युरापातहा ह्या विषयासबंधाने फार मतभेद आहेत. कितीएकांचे मणण हा सर्व वणेने झूट व असंभाव्य आहेत. त्यांचे ह्मणणे असे की, समुद्रामध्ये आपाआप उगवणाऱ्या कांहीं वनस्पति व वेली आहेत. त्याचा आकारही अतिशय भयंकर त्य भयकर व विस्तृत असतो. त्यांची लाटांनी वगैरे हालचाल झालेला पाहूनच ही वरची मंडळी भ्याली असेल; व त्या भयाने गांगरलेल्या स्थितींतच त्यांनी हे गंधर्वनगरांतील उमाळे रचल असावेत ! कित्येकांनी त्याच्या उलट पक्ष घेऊन त्यांचे सप्रमाण खंडन केले आहे. तेव्हां ह्यांत खरे काय ? असा प्रश्न सहजी उद्भवतो. त्याचा निकाल डाक्टर एंड्रयू विलसन ह्या प्रसिद्ध प्राणिशास्त्रवेत्त्यांनी केला