या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. आहे; व तोच सर्वमान्य होण्यासारखा आहे. त्याकरितां तेवढा देऊन हैं वर्णन समाप्त करतो. RITERAR TIER "ह्यामध्ये पहिला विचार हा की, सारेच लेखक निव्वळ खोटें लिहितील असें विशेष कारण कांही दिसत नाही. आणखी, प्रत्येकानें निरनिराळ्या कालीं व निरनिराळ्या स्थळी लिहिलेले लेख असतांही, बहुतेक अंशी सारखे आहेत; त्यांच्यामध्ये एकवाक्यता आहे; अगदी विरुद्ध भाग असा कोठेही नाही. दुसरा विचार हा की, त्यांनी काही भ्रमाने व अतिशयोक्तीने लिहिले असले तरी, तो भाग वजा करूनही बाकी पुष्कळ तथ्यांश शिल्लक राहतो. आणि तिसरा विचार हा की, शास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे असे जगड्वाळ प्राणी समुद्रांत उत्पन्न होणे शक्य आहे, येवढेच नव्हे तर अशा प्रकारचे प्राणी जे कधीं मनुष्याच्या दृष्टोत्पत्तीस आले नाहीत ते समुद्रामध्ये-मनुष्यागमनमर्यादेच्या बाहेरअसले पाहिजेत ह्यामध्येही काही संशय नाही." मनाची उडी मार श्लोक. ( शार्दूलविक्रीडित.) देवाची करणी अतळ असते, भावी न कोणां कळे कोणां राज्य मिळे, अखंड पिकती, कोठे सुखाचे मळे । लाभे कोण सुदैव, कोण फिरती, अन्नाविणे बापुडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १ ॥ हे माझें घरदार वैभव किती, पैसाहि गांठी किती ! आहे काय घरांत आज कमती, खाया न प्याया मिती । खेळू रंग मजेत दंग असतां, संपत्ति देते दडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥२॥ भिक्षापात्र भरेल धान्य मिळुनी, हर्षे दरिद्री ह्मणे ह्याचे दुप्पट दाम वाढवुनि हे, होईल सारें दणें । होऊं लग्नसुखांत मग्न पुढती, ऐशी मनाची उडी होतें भग्न तरी, मधेच फुटुनी, तें पात्र पायांबुडी ॥३॥