या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. कोणाला अनुकूल सर्व असतां, इच्छा वसे दांडगी व्हावा मत्सुत शाहणा चतुरही, विद्या शिकावी उगी । की 'सूर्याच्या उदरीं शनेश्वर' गमे, जन्मे अशी ये घडीमा न होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ ४ ॥ विद्यार्थी ह्मणतो करीन सरशी, बक्षीस संपादिन या घेइन उंच उंच पदव्या, येईल ऐसा दिन । तो येते अनिवार संकट घरी, खायास लागे छडी के होते भग्न जरी, सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ ५ ॥ माझें द्रव्य ह्मणे, वणिग्जन पहा, माझी दुकानें किती घालावी भर यांत यत्न करुनी, धंदेहि नाना रिती । तोटा ये गुजरींत जो ह्मणतसे, माझी चढावी 'दुडी'" होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ ६ ॥ माझें औषध 'रामबाण' ह्मणतो, मी सिद्ध धन्वंतरी ह्याचा ये गुणही अचूक समजा, घ्या हो तरी सत्वरी। भाळीं ये 'यमराजबंधु' टिकला, रुग्णास दे जों पुडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची रडी ॥ ७ ॥ ईयेनें रचितात लेखनपट, चातुर्यकोटिक्रम 'बाबा ! तेल नसे गृहीं लवणही', ऐकोनि होती श्रम । उद्योगांत अशा किती घडिघडी, येतात सांगू नडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ ८॥ लोकांचे लुटुनी समस्त धन मी, व्हावें कुबेरापरी कृत्ये चोर अघोर इच्छित असे रात्रंदिनीं अंतरीं । तो पायीं जड शंखला पडुनियां, मार्गात फोडी खडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥९॥ कानी ठेवुनि लेखणी निजमनीं, चिंतीतसे सर्वदा या घेइन, कारकून ह्मणतो, मी उच्च लक्ष्मीपदा ।