या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. 'हच्चे' 'कीर्द, खतावणी', न सुटते, हाती सदा चोपडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १० ॥ गर्जे भार्गवराम की, करिन मी, निःक्षत्रिया ही मही हात केले क्षत्रियवंशकंदन बहू, ठेवी न बीजासही। . जन्मे तो रघुवीर मूर्ति सहजी, हेतू न गेला तडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ ११ ॥ भक्तीचा उदधी मनें हरिपदी, केला जयाने रिता आनंदें शरतांडवें गुरुवरा जो जाहला पूजिता । भीष्माची वळली परंतु समरी, त्याची पुरी रेवडी dि होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १२ ॥ ज्याचे वैभवही कुबेर बघतां, घेईल लज्जा मनी नाना भोग विलास राजभुवनी, भोगी अहो यामिनी । ऐसा क्रीसस त्यास अंतसमयीं, आली कपाळी बिडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १३ ॥ १. परशुरामाने आपल्या दिव्य परशुप्रहाराने एकवीस वेळ पृथ्वी निःक्षत्रिय केली खरा. पण आणीबाणीच्या वेळी दशरथराजा स्त्रीसमूहांत लपला व त्याच्या पोटी राम जन्मास आले. तेव्हां परशुरामाचा पण कोठे गेला! २. देवव्रत भीष्माचायोनी मूर्तिमंत भगवानास. घनघोर प्रतिज्ञेनें व अलौकिक समरपटुत्वानें, पांडवसेना भाजून काढून, सुदर्शन धरावयास लावलें, व 'ये रथावरि झणीं यदुराया' अशी हांक मारून, उचंबळलेला भक्तिसागर भगवच्चरणी रिता केला. प्रत्यक्ष परशुरामास-आपल्या गुरूस 'शिष्या दिच्छेत् पराजयम्' या न्यायाने, शरतांडवाने शोडषोपचार पूजिलें. पण केवळ क्षुद्रशिखंडीच्या हातून पराजित व्हावे लागले. ३. इ. स. पूर्वी ५५७ त हा राजा लिडियाचा अधिपती झाला. हा राजा मोठा संपत्तिमान् होऊन गेला. ह्यास हरएक गोष्टीत यशःप्राप्ति होत गेल्यामुळे, त्याचे वभव इतके मोठे झाले की, अद्यापही 'कुबेराची संपत्ति प्रमाणे काय 'क्रीससचा दालत लागून गेली आहे, असे एकाद्या मातबर मनुष्याच्या संपत्तीस ह्मणण्याचा पाश्चात्य देशांत प्रघात आहे. इराणचा बादशहा सायरस याची व क्रीससची लढाई होऊन, क्रीससचा पराभव झाला. व एवढी कुबेरासारखी ज्याची अपार संपत्ति, त्याला शेवटा हातांत शृंखळा वागविण्याचा प्रसंग आला ! सायरसाने त्यास जीवदान दिले.