या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. जो पन्नास हजार वीर समरी, कापी चरारां करी जो युद्धोत्सुक हॉनिबाल ह्मणती, ऐशीच त्याची परी । होतां तो हतवीर्य त्यावरि पुन्हां सेना न राहे खडी वाम होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १४ ॥ जिंकी देश अनेक जो भुजबळे, भाळे जयश्री जया नया दो खंडांत अजिंक्य वीर ह्मणती, पझिं ज्या राजया । हा ! हा ! काल फिरे अरी तंव हरी, प्रासाद, किल्ले, गढी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १५ ॥ पादाक्रांत करीन खंड अवघे, हा हेतु ज्याचा खरा बोनापार्ट कृतांत काल सकलां, ज्याचा दरारा पुरा ।। शिक्षेची, रणधीरवीरमणिला, अंती मिळे कोठडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १६ ॥ मी मी गर्नुनियां निशाण भगवें, सिंधूतटीं रोंविले गांठोनी, अटकेस शत्रकटकें, पाणी हयांना दिलें। १. आफ्रिकेंतील पूर्वकालीन कार्थेजमधील एक प्रख्यात वीरशिरोमणी होय. ह्यान केनीच्या लढाईत रोमन फौज पन्नास हजार खपविली, असे इतिहासांतरी वर्णन आहे. पण अशा मी मी ह्मणणाऱ्या 'कर्तुमकर्तु' वीराचाही रोमनवीर सिपिआ याने झामाच्या लढाईत 'न भूतो न भविष्यति' असा पराभव केला! हा पुढ बरेच दिवस हयात होता. तथापि पुनः लाच्याने फौज उभी करवली नाही. २. हा इराणचा एक 'अजिंक्य' बादशहा होउन गेला. इ. स. ५९० त ह्या बादशहास राज्यपद मिळाले. हा मोठा गुणग्राही, चतुर, राजकार्यदक्ष, प्रजेचे पुत्रवत् पालन करणारा, रणधुरंधर व विजयी असे. ह्याने अनेक नवे प्रांत जिंकून इराणचे वैभव व शक्ति द्विगुणित केली. ह्या ह्याच्या शौर्यगुणाने त्यास 'विजया'पर्वीझ' असें ह्मणत. ह्याचें नांव खुशरू असें होतें. ह्याने पुष्कळ दिवस आपल्या अतुल वैभवाचा सुखाने उपभोग घेतला. पण शेवटी मात्र हेराक्लियस नामक रोमन सरदाराने ह्याचा पुरा मोड करून, त्याच्या आवडत्या दास्तागर्द येथील महालाची धळधाण केली. पुढे ह्या बादशहाचा अंतकाळी फारच छळ होऊन तो इ. स. ६२८ त मारला गेला. ३. फ्रान्सचा सुप्रसिद्ध बादशहा नेपोलियन बोनापार्ट होय. ह्याची , माहिती हल्ली बहुतेकांस आहेच.