या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९. मोड़े पाणिपती कशी विधिबळे, त्यांच्या यशाची गुढी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १७ ॥ लक्ष्मी तो परिपूर्ण सर्व असतां, कांता निघे जारिणी ना बोले 'धिक मदना', 'सुरम्यवदना', दुःखास साऱ्या धनी । राजा मैतहरी विराग धरुनी, वांच्छी मनीं झोंपडी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १८ ॥ गोष्टी कैक अशा समस्त कथितां, विस्तार होतो अती लाप तात्पर्य गणती करोनि सुमती घेतील वाटे स्मृती । 'आहे जो भट तों तिथीच नसते', ही नेहमींची रुढी होते भग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ १९ ॥ हर्षे पोत ह्मणे बसोनि सहजीं, काव्ये करूं उत्तम येतां अज्ञपणा मनांत अपुला तो दूर होतो भ्रम । आहे स्वस्थपणा मनास, वसते कायर्यात तों आवडी होते मग्न जरी सदैव असते, मोठी मनाची उडी ॥ २० ॥ १ एक, आणि एकाच तत्त्वाचा बनलेला पदार्थ, जसें पाणी-ह्याला निरनिराळे लोक निरनिराळी नांवें देतात. एक 'पाणी' ह्मणतो, दुसरा 'नीर' ह्मणतो; तिसरा 'अक्का' ह्मणतो; आणि कोणी 'वाटर' ह्मणतो. त्याप्रमाणे अद्वितीय 'सच्चिदानंदा'चा धावा करतांना कित्येक त्यास 'ईश्वर' हाणतात; कित्येक 'अल्ला' ह्मणतात; कित्येक 'गॉड' ह्मणतात; कित्येक 'हरि' ह्मणतात; व कित्येक 'परब्रह्म' असें ह्मणतात. १. इ. स. १७६१ त पेशव्यांचा पाणिपतच्या युद्धांत मोड झाला. २. भर्तृहरीनें 'धिक तां च, तं च, मदनं च, इमां च, मां च' ह्मणून, जारिणी स्वस्त्रीचा त्याग करून, राज्यैश्वर्यावर लाथ मारून, कडकडीत वैराग्य धारण केले. सर्व प्रकारची अनुकूलता, राज्यश्रीचे तेज, रूपवती स्त्री हे सर्व असून देखील आनंदाने राज्यसुख भोगण्याचे बिचाऱ्याच्या नशीबी नव्हतें.