या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. २ एकदा एका सरड्याच्या रंगाबद्दल वादविवाद करतां करतां, दोघे गृहस्थ अगदी निकरावर आले. एक ह्मणाला " त्या माडाच्या झाडावरचा सरडा अगदी लालभडक रंगाचा आहे.' दुसऱ्याने त्याचे झणणे खोडून काढले. तो ह्मणाला "ही तुझी चूक आहे. सरडा तांबडा नाही; तो निळ्या रंगाचा आहे." ह्याबद्दल ते दोघेही आपआपली साधकप्रमाणे देऊ लागले. ह्यामुळे कोणताच निश्चय होईना. ह्मणून ते, त्या झाडाखाली एक गृहस्थ राहून सरड्याचे पालटलेले रंग लक्ष्य लावून पहात होता, त्याजकडे गेले. नंतर त्यांपैकी एक गृहस्थ ाणाला " का हो महाराज ! ह्या झाडावरचा सरडा तांबड्या रंगाचा नाही का?" तो गृहस्थ ह्मणाला " होय बाबा." तेव्हां तद्विरुद्धपक्षी ह्मणाला " आपण काय सांगतां हे ? असे होईल तरी कसे ? तो तांबडा नाही; निळा आहे.' तो गृहस्थ मोठ्या विनयाने पुन्हा ह्मणाला "होय महाराज. निळाही आहे. कारण, त्या गृहस्थाला सरडा हा प्राणी नेहेमी रंग बदलणारा आहे, हे माहित होते. ह्मणून त्याने ह्या वाद करणाऱ्या दोघांसही " होय" असेंच उत्तर दिले. त्याप्रमाणे 'सच्चिदानंद' स्वरूप निरनिराळे आहे. ह्मणून भक्त ज्या स्वरूपांत परमेश्वराला पाहतो, त्याला तेंच एक स्वरूप माहित असते. तरी त्याची भिन्न भिन्न स्वरूपे एकरूपात्मकच आहेत; असें जो जाणतो, तो ह्मणतो की ही सर्व स्वरूप एका परमेश्वराचीच असून तो परमेश्वर अनंतस्वरूपी आहे." तो निर्गुणही आहे आणि सगुणही आहे; आणखी त्याची स्वरूपें अनंत आहेत, ती कोणास कळावयाची नाहीत. की.३ धुराचे दिवे, शहरच्या निरनिराळ्या भागांना निरनिराळ्या आकारांच्या ज्योतींनी प्रकाशित करतात. परंतु प्रकाशाचें मूळ-हणजे ग्यास-तो एकाच नळातून येत असतो. तद्वत् सर्व युगांतील व सर्व देशांतील धर्माचार्य ह्या निरनिराळ्या ज्योति आहेत. त्यांच्या द्वाराने. परमात्म्याच्या अगाध प्रकाशसंचमापासन अखंड वाहणारा आत्मप्रकाश प्राप्त होतो. REMS परिसाच्या स्पर्शाने एकदां लोखंडाचे सोने झाले, ह्मणजे मग ते तुझा जमिनीत पुरून ठेवा, की, उकिरड्यावर फेंकून द्या. तरी तें सोनेंच्या सोनंच असावयाचे. ते पुन्हा लोखंड व्हावयाचे नाही. त्याप्रमाणे परमेश्वराच्या चरणाच्या स्पर्शाने ज्याचे अंतःकरण एकवार पुनीत झालें, तो संसाराच्या उपद्या त असो, की अरण्यांतल्या एकांतांत असो; त्याला अपवित्रता कधी शिवावयाची नाही. anisfoनाबाजी