या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. गामाची फक्त एक वेळ भेट मात्र घेतली. पण पुढे जी त्याची विटंबना झाली तीस पारावार नव्हता. रस्त्यांत धूळ तर खावी लागली; दोन दिवस बंदरावर अटकून पडला; अखेर जीव वाचतो किंवा नाही ह्याची सुद्धा त्यास धास्ती पडली. पण एकदांचा जेमतेम-मोठ्या शर्थीनें गलबतें हाकारून चालता झाला. मलबारचा अर्वाचीन इतिहास (के. कोकिळ पु. १ अं. ९) पहा. पान-६२०-'पायदळाचा मान फारसा नसे, व त्यांस बंदूक वापरण्याची भीति वाटत असावीसें दिसते. कारण, प्रत्येकाजवळ बंदूक ठेवण्यास एक लांकडी घोडा असे. त्याजवर ठेवून ते बंदूक सोडित. बंदूक फुटण्याचे व हात भाजून घेण्याचे भय त्यांस विशेष वाटे.' हे विधान जर एखाद्या लष्करी खा. त्यांतील मनुष्याने ऐकले, तर तो पंतोजीबुवांस खरोखरीच हांसेल ह्यांत तिळमात्र शंका नाही. शिपायांना बंदुक मारतांना ' हात भाजण्याचे विशेष भय वाटे ह्मणून ते घोडा ठेवीत ' असें झणणे झणजे युद्धकलाविशारदत्वाची शिकस्त झाली. घोडा ठेवण्याची चाल हात भाजण्याकरितां नव्हती. पूर्वीच्या बंदुका ह्मणजे लहानशा तोफेवजा होत्या झटले तरी चालेल. त्या अतिशय पलंदार असून भारी अवजड असत. तीस हातांवर तोलून धरून शिस्त धरणे केवळ दुरापास्त असे. ह्मणून त्यांस घोडे करीत. अद्यापही कोठे कोठे गांवगन्ना चावडीवर अशा प्रकारची मोडकी तोडकी अरबी फ्याशनची पल्लेदार बंदूक आढळते, व तिच्याबरोबर तिचा घोडाही पण असतो. पण असता. काही पान-१००-ह्यांत पद्मिनीची हकीकत आहे. हीत एक विलक्षणच च. मत्कार दृष्टीस पडतो. बादशहा पद्मिनीचे स्वरूप पाहून परत जातांना भीमसिंग त्यास पोचवावयास गेला. तेव्हां त्यास बादशहानें कैद करून ठेवले. ह्मणून पद्मिनीने कपटयुक्ति लढविली. आपण स्वतः येते असा बहाणा करून बुरख्याच्या सातशे पालख्यांतून हत्यारबंद शिपायी बादशहाच्या गोटांत पाठविले. बादशहाने पद्मिनीस आपल्या 'बापास' भेटावयास अर्ध्या तासाची परवानगी दिली, पद्मिनीचा बाप झणजे सिंहलद्वीपचा राजा. त्याचे येथे नांव ना ग्रहण. भीमसिंग तर तिचा नवरा. तेव्हां हा प्रकार काय ? पान १२॥१४-ह्यांत महंमद पैगंबराची हकीगत आहे. त्यांत ग्रंथकार ह्मणतात " महंमदासारखे पुरुष निपजतात, तेव्हांच त्यांस थोर पुरुष ही संज्ञा प्राप्त होते. परंतु "भारतीय साम्राज्य" पुस्तक सात-इस्लामधर्म-ह्यांत