या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २४९ मांस घेऊन खात होते. तो त्यांचा प्रकार पाहून आमच्या हिकडील लोकांस तर मूर्छाच येईल. रेनदीर मेजवानीसाठी आणून उभे केलें ह्मणजे कधी कधी लहान लहान मुलें तें जिवंत असतांनाच हातामध्ये सुरी वगैरे घेऊन त्याच्या मांसाचे तुकडे काढकाढून खाण्यास सुरवात करतात !!" हे लोक इतके घाणेरे असतात की, त्यांच्या जवळ बसणे सुद्धां इतर लोकांस दुःसह वाटते. त्यांच्या अंगावर उवा किती असतात ह्याची तर क्षितीच नाही. ह्या लोकांचा मुख्य धंदा शिकार करणे आणि मासे मारणे हा. त्यांत ते तरबेज असतात. धनुष्य, बाण, आणि भाला ही त्यांची मुख्य हत्यारे.. ह्यांची धनुष्ये फार लांबलचक व भक्कम असतात. प्रत्येक धनुष्याची लांबी सहा फूट ! झणजे तें वागविणाराहनही कितीतरी मोठे! त्याचे बाण चार चार फूट लांब असतात. ह्या बाणांत तीन प्रकार असतात. एक पोलादी पात्यांचे. हे मोठ्या जनावरास मारतात. कित्येकास पुढे बारीक बारीक गोळ्या, व माशाच्या गळ्यांसारखे बारीक आकडे किंवा हक बसविलेले असतात. एखादा पक्षी किंवा प्राणी अतिशय लहान असला, तर तो मारतांना त्याचे चामडे फार फाटले जाऊ नये ह्मणून ह्या बाणांचा उपयोग करतात. तेथें लांडग्यांचा मनखी उपद्रव असतो. ते रात्रीचे येऊन त्यांच्या जनावरांवर हल्ला करतात, व रेनदीर. कुत्री वगैरे जनावरे घेऊन जातात. ह्मणून एक दोन मनुष्यांस हातांत एक दोन मोठमोठाले भाले घेऊन रात्रभर पहान्यावर बसावे लागते. काळे अस्वल हे एक मोठे बलाढ्य जनावर आहे अशी त्यांची समजूत आहे. त्याच्यावर त्यांची इतकी श्रद्धा असते की, सामोयिड लोक त्याला एक देवता मानतात. न्यायाधीशाच्या कोटीत ह्या लोकांची साक्ष घेण्याचा प्रसंग आला तर, अस्वलाच्या मस्तकाची शपत घेण्याची चाल आहे; व ख्रिश्चियन लोक बायबलाची शपत घेतांना जसे त्या ग्रंथाचे चुंबन घेतात, त्याप्रमाणे त्यांनी जिभळ्या चाटून कांहीं गिळले असा अभिनय करावा लागतो. ह्यांतील उद्देश असा की, आपण खरे सांगितले नाही तर, ते अस्वल मला असें गिळून टाको!