या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९, असलेली आणखी दुसऱ्या बाजूची माहिती थोडीशी अधिक पाहिजे होती. निःपक्षपाती ग्रंथकार हाटला की, त्याने दोन्हीही पक्ष दाखविणे जरूर आहे. पान-११-" महंमद फार सज्जन होता. त्याची योग्यता मोठी होती. वरचेवर स्वाऱ्या करून त्याने मूर्ति फोडल्या; देवालयें हस्तगत केली; त्यांत पैशाच्या लोभाखेरीज वाईट हेतु नव्हता.” आणखी वाईट हेतु तो कोणता असावयाचा ? आणि इतरांचा तरी कोणता असतो ? ह्यावरून मूर्ति फोडणे, देवालये हस्तगत करणे, पैशाची लूट करणे हे ग्रंथकाराच्या मताप्रमाणे सद्धेतूसे दिसतात ! ह्या ठिकठिकाणी ग्रंथकारांनी केलेल्या मंडणाचा अर्थ काय तोच समजत नाही. पान-१०-" सोमनाथाचे दरवाजे ८०० वर्षांनी इंग्रजांनी मोठ्या समारंभाने आय्यांत आणले. ते तेथे किल्लयांत अंधारखोलीत पडून आहेत." का ? इंग्रजांनी आणण्याचे कारण काय ? ते त्यांस कसे मिळाले १ इत्यादि शंका उत्पन्न होतात. पण सोमनाथाच्या देवालयाच्या दरवाजाचे शुद्ध 'गौडबंगाल, होतें. त्याबद्दल मेडोज् टेलर साहेबांनी आपल्या हिंदुस्थानच्या इतिहासांत इंग्रजीकामदारांचा फारच फज्जा उडविला आहे. तो ऐकण्यासारखा असल्यामुळे, आह्मी जशाचा तसाच येथे दाखल करतो:-साहेब ह्मणतात: "पण ह्याहूनही विशेष खच्छंदीपणाचा, व विलक्षण असंबद्धतेचा मासला झटला ह्मणजे सोमनाथाच्या देवालयासंबधी-किंवा प्रथमतः सोमनाथाच्या ह्मणून ह्मटलेल्या दरवाजासंबंधी जाहिरनामा हा होय. गव्हरनर जनरल साहेब हिंदुस्थानांतील लोकांना आणि राजेरजवाड्यांना सांगतात 'माझे बांधव आणि मित्र हो! आमच्या युद्धविशारद सैन्याने अफगाणिस्थानांत दिग्विजयाचा झेंडा लावून सोमनाथाच्या देवालयाचे दरवाजे आणले आहेत, आणि महंमदाच्या छिन्नभिन्न झालेल्या थडग्याला, गज्नीचा विध्वंस झालेला पाहून रडत बसावयास लावले आहे. अशा प्रकारे ८०० वर्षांच्या पूर्वी झालेल्या अपमानाचा सूड उगविण्यांत आला.' ह्याच्या पुढील वल्गनांचा पुनरुच्चार करण्यांत अर्थ नाही. या जाहिरनाम्याचे भाषांतर प्रत्येक हिंदुराजाच्या दरबारांत वाचले गेले. आणि ते वाचून दाखवितांना रेसिडेंटांनी व पोलिटिकल एजंटांनी आपली तोंडे चिमणीसारखी केली होती. बरे; इतके केल्यासारखें ते दरवाजे सोमनाथाच्या देवळाचे तरी असावयाचे होते ? गव्हरनर जनरल आ. ग्र्यास जावयास निघाले, तेव्हां मथुरेतील कितीएक ब्राह्मणांनी त्या दरवाजांची पू. जाही केली. परंतु ते आग्र्यास पोंचल्यानंतर त्यांस दारूखान्याच्या कोठडीत गाढून टाकलें, व पुन्हा बाहेर काढले नाहीत हा तरी एक शहाणपणाच केला." F