या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. हे 'गंधर्वनगरीचे उमाळे' कोणीकडे, आणि राव. सरदेसाई ह्यांनी सांगित लेला बडेजाव कोणीकडे ! ह्याचा वाचकांनीच विचार करावा. मा . पान-९-" दाहिर राजाजवळ मुसलमानांनी जहाज पकडलेले परत मा. गितले. परंतु देवलबंदर दाहिरच्या ताब्यांत नसल्यामुळे त्याला तें कबूल कर. वेना." तर तें बंदर कोणाच्या ताब्यांत होतें ? ही जिज्ञासा राहते. जाजा पान-१२०-महमुद तुलखाच्या कृत्यांचे वर्णन केले आहे. त्यांत 'दातां. वर कबर बांधण्याचे जे पूर्वीपासून प्रसिद्ध कृत्य, तें कां नमूद केलेले नाही ? न पान-५९९-" राणा राजसिंहाने औरंगजेब बादशहास लिहिलेले पत्र, त्या वेळींचसे काय, पण आजमितीस सुद्धा मुत्सद्दी चातुर्याचा व राजकारणकौ. शल्याचा उत्तम मासला ह्मणून नावाजले जाण्यास योग्य आहे." असाच ह्या पत्राचा उल्लेख मागें २२६ पृष्ठामध्येही केला आहे. तेव्हां तें पहाण्याविषयी १. उत्कठा वाढणं साहजिक आहे. अशीच दुसऱ्याही कित्येक पत्रांची व लेखांची ग्रंथकारांनी अनेक वेळ प्रशंसा केली आहे. 'स्थलसंकोच असला तरी ती देणे, किवा त्यातील थोडासा भाग तरी नमुन्यादाखल देणे अगत्याचे होते. जाय पान-२४१-त्या वेळी मानसिंहाने वेड्याचे सोंग घेऊन चतुर्सिहास गादी ।पल हात.' असें करण्यांत हेतु कोणता ? Pos पान-५९७--"एकदां एक मंत्रविद्येचें ढोंग करणाऱ्या बाईनें दिल्लीतील | लोकांस चिथवून प्रत्यक्ष बादशहासही पदच्युत करण्याची वेळ आणिली होता." - ह्या हकीगतीसंबंधाने थोडासा तरी अधिक तपशील पाहिजे होता. 1-६४७-" त्या वेळी मुख्य मुख्य रस्ते हिंदुस्थानांत कोणते होते, हे दाखविण्यासाठी एक नकाशा शेवटी दिला आहे." तो आहे कोठे ? जा बादशहा झटला की, तेथें बीरबल यावयाचाच. ह्याच्या चातुर्याच्या -खोट्या नाट्या गोष्टी सुद्धा आमच्या हरिदासांत व मुलांबाळांत ओतप्रोत भरून आमच्या करमणुकेच्या साधनांत त्या केवळ वतनदारच होऊन बसल्या आहेत. असे असता त्या बिचान्याच्या नांवावांचन ह्या मुसलमानी रिसायतीत दुसरी यत्किंचितही माहिती नाही, ही सर्वांत आश्चर्याची गोष्ट होय ! तसेंच शेवटच्या सूचीपत्रांत 'मुल्क्.इ-मैदान'सारख्या तोफांची सुद्धा नांवें आहेत. परंतु बिशाद नाही की, 'ताजमहाला'सारख्या जगद्विख्यात इमारतीचें नांव येईल! आतां पुस्तकाच्या बाह्यस्वरूपाविषयीही दोन शब्द येथे सांगणे जरूर आहे.'