या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ३ रा. मार्च १८९९ प्रथमतः ह्या ग्रंथांत एक गोष्ट मोठी घसरली आहे असें आह्मी ह्मणतो. ती गोष्ट ही की, अकबर बादशहाच्या कारकीर्दीपासून 'पुस्तकांत चित्रे घालून त्यास मनोरम स्वरूप देण्याचा जर प्रघात पडला होता' तर ती कल्पना एकुणिसाव्या शतकांत, विलायतसारख्या दिव्य प्रदेशांत जाऊन येणाऱ्या, श्रीमंतांच्या पदरी असलेल्या ग्रंथकारास सुचू नये हे खरोखरच आमच्या दुर्भाग्याचे लक्षण होय. 'बालबोधा 'सारख्या मासिक पुस्तकांत बहुतेक बादशहांचे कट येऊन गेलेले होते; श्री. गायकवाडांसारख्यांच्या संग्रहीं अनेक तसबिरा असण्याचा संभव होता; रा. वैद्यांसारखे हुशार इन्ग्रेव्हर होते; व ह्या कामास विशेषसा खर्च आला असता असेंही नाही. पण तेवढ्याने ह्या ग्रंथास काही रमणीयता आली असती, असो. 'मराठी रिसायतींत ' तरी ह्याचा लाभ आझांस घडेल, अशी दृढतर आशा आहे. पुस्तकाचे बाह्य स्वरूप 'स्पृहणीय ' झाले नाही, ह्मणून ग्रंथकारानीही बहुत खेद प्रदर्शित केला आहे. तेव्हा इतर कोणत्याही बाबतींत आमचे काही ह्मणणे नाही. तरी छपाईकडे लक्ष्य पुरविणे जरूर होते. आमच्या पुस्तकांतील ५८ व ६३ ही दोन पाने तर इतकी अस्पष्ट छापली गेली आहेत की, ती बहुतेक वाचावयासच मिळत नाहीत झटलें तरी चालेल. हा प्रकार आमच्याच प्रतीपुरता असेल, तर काही मोठीशी फिकीर नाही. परंतु पैसे देऊन विकत घे-- णाऱ्यांच्या प्रतींतही जर असाच प्रकार दृष्टीस पडेल तर मात्र इष्ट नव्हे. ह्याब• द्दल पुढे तरी सावधगिरी ठेवण्यास मिळावी ह्मणून सविनय आह्मी सूचना करित आहों. ह्याप्रमाणे सदरहू ग्रंथांत दोषस्थळे कोणती आहेत, व कोणत्या सुधारणा करणे आवश्य आहेत ह्यांचाही आह्मीं यथामत्या निर्देश केला. ह्यामध्ये लिहिण्याच्या झपाट्यांत नजरचुकीनें ग्रंथकाराच्या मनास लागण्यासारखे काही शब्द पडले असल्यास त्याची मित्रभावाने ते मन:पूर्वक क्षमा करतील, व सत्यासत्य कळवितील तर त्यांचे आह्मी अत्यंत उपकारा होऊ. प्रस्तुतकाली ग्रंथकर्तृत्वाचे काम अगदीच निकृष्टावस्थेस पोंचलेले आहे. प्रपंचस्वास्थ्य, मनाचें स्वास्थ व वेळ ही त्रिपुटी एक होण्याची आधीं मारामार, मग त्यांस कर्तृत्वशक्तिही सहाय्य पाहिजे. इतक्यांतून पार पडले, तर तो ग्रंथ छापावा स्वतःच्या खर्चाने, राजे त्याच्याकडे ढुंकून पहावयाचे नाहीत; विद्वान् हातीं धरावयाचे नाहीत; श्रीमंत घ्यावयाचे नाहीत; आणि भक्त असतील त्यांच्याजवळ त्राण अ