या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. सावयाचे नाही. मग त्यांच्या दहा पांच प्रति मुफत-पदरची तिकिटें लावून वर्तमानपत्रकारांकडे व मासिकपुस्तककारांकडे रवाना करावयाच्या! नंतर त्यांस जागृत करण्याला पत्रे व काडें ! इतका विधि होईल तेव्हां कोणांत पोंच आली तर, मोठी मिळविली असें होतें. न होऊन अभिप्राय देण्याचे कोणाच्या नशिबी आलेच, तर 'बरें आहे; लोकाश्रयास पात्र आहे; वाचण्यासारखें आहे.' येवढी शब्दमौक्तिकें कोठेतरी एका कोपऱ्यांत किंवा रंगी पेजावर बाहेर पडावयाची ! किंवा ह्याहीपेक्षां 'बोल बलाय' झटली झणजे फटकळ मासिक पुस्तकें ! ह्यांच्या सारख्यांकडून ग्रंथकाराला आश्रय-नजरनजराणा-मिळण्याचे तर लांबच-कारण ह्यांनी अभिप्रायास कलम घेतले, तर तो पुरा होण्यापूर्वीच 'हे बाबा नास्ति तैलं न च लवणमपि' अशा आरडीने त्यांचे तापलेले डोकें सातदां भणाणावयाचे, अशी ह्यांची स्थिति !-तेव्हां त्यांच्याकडचा सन्मार्च 'गचाळ ' 'भिकार ' 'नादान' असली चार दोन कमीजास्ती पुष्पं माथ्यावर पडावयाची हा ! तेव्हां ही सर्व वस्तुस्थिति लक्ष्यांत घेऊन व रावसाहेब सरदेसाई ह्यांचे परिश्रम मनांत आणून राजेरजवाडे, श्रीमान् , सरदार, शेटसावकार, व ज्यांस ज्यांस सामर्थ्य आहे असे विद्याभिलाषी तमाम लोक त्यांच्या गुणांची चीज करतील अशी आह्मी दृढतर आशा करतो. व 'मुसलमानी रियासती'ने जसा आमचा पुस्तकसंग्रह सुशोभित झाला, तशाच त्यांत 'मराठी रियासत' व "ब्रिटिश रियासत' येऊन विराजमान होवोत, येवढेच नव्हे, तर ग्रंथकाराने धरलेल्या मोठ्या उमेदीप्रमाणे 'मोठा इतिहास' त्यांच्या हस्ते घडवून आणण्याचे त्यांस सामर्थ्य येवो, अशी परमेश्वरास अनन्यभावें प्रार्थना करून, व स्वदेशाची, स्वदेशबांधवांची एकनिष्ठ सेवा उत्तम प्रकारें बजाविल्याबद्दल रावसाहेब गोविंद सखाराम सरदेसाई बी. ए. ह्यांचे पुनरपि एकवार प्रेमभावाने अभिनंदन करून हा लांबलेला अभिप्राय येथे समाप्त करतो. PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay.