या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. - वन्ठिी06 पु०१३] उ०१३] - [अॅ०४ एमालमs लाका टिटवी. टिटवा. कित्येक वस्तु व प्राणी असे आहेत की, ते एका देशांतील लोकांस गल व तिरस्कार्य वाटतात, आणि तेच दुसऱ्या एखाद्या देशांत शुभसूचक, अत्यंत पवित्र, व परमपूज्य असे वाटतात. ह्याच कारण केवळ रूढी ! ह्यापेक्षा अधिक कांहीं कोणास सांगतां यावयाचे नाहा. नरटी' व 'जोडा' हे दोन्ही पदार्थ आपल्या देशांत अभद्र मानतात; परंतु मलबारांत मोठमोठाल्या मेजवानीत व लग्नकार्यातील मगलप्रद दीपांच्या तेलवातीकडेही नरटीचा उपयोग करतात. चर्मी जोड्यास आह्मी नीच मानतो. परंतु चीनदेशांत मंगलसांप्रदायांत त्यांची तारणे बांधतात, युरोपियन लोकांच्या लग्नोत्सवांत आमच्या मंत्राक्षतेप्रमाणे नूतन दंपत्यावर चर्मपादुकांचा वर्षाव करतात ! प्राण्यांची गोष्टही तशीच. आमच्या देशांत 'घुबड' मटले की अनिष्टसूचक-त्या बिचायचे कोणी नांव सुद्धा काढतां कामा नये. पण तेच ग्रीक लोकांचे जागृत दैवत ! गाढवावर आमची केवढी इतराजी ! जनावरांतील अतिशूद्राची किंवा चांडाळाची पदवी त्याला! पण तेंच एदन, इराण हिकडे