या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. विपुल असतात, व ओलाव्याचा अंश असतो. नुकत्याच नांगरलेल्या | किंवा कुळवलेल्या शेतांतही हे पक्षी दृष्टीस पडतात. मात्र त्यांचे भक्ष्य जे कृमिकीटक ते तेथें मनमुराद असले पाहिजेत. जमिनीच्या आंतून कृमिकीटकांस वर हुसकून आणण्याची त्यांची कला मोठी गमतीची असते. हा पक्षी प्रथमतः आपल्या पायाने जमिनीस किंवा ढेकळास जोराने धक्का देतो, तेणेकरून लहानशा जाग्यांत बराच हदरा बसतो. तेव्हां कृमिकीटकांस असा भास होतो की, उंदीर, घूस वगैरे कोणीतरी प्राणी खालून येत आहे. ह्मणून ते खालच्या शत्रूस टाळण्याकरितां मोठ्या बेताबेताने वर येऊ लागतात तो अचानक ह्या पक्ष्याच्या चोचीत पडतात. समाजाती टिटवीच्या आंगी सर्वात प्रशंसनीय चमत्कारिक गुण मटला ह्मणजे खच्छता राखण्याविषयीं जपणे हा होय. किंबहुना टिटवी हा पक्षी,, खच्छतेचा मूर्तिमंत पुतळाच होय असें मटले तरी सुद्धा अतिशयोक्ति होणार नाही. स्वच्छतेच्या संबंधाने मांजराची मोठी शिफारस करतात. कारण, ते फावल्या वेळी आपल्या पंजास थुकी लाऊन त्याने जीभ न पाँचणारा मस्तकाचा भाग सुद्धां साफ करीत बसते. परंतु टिटवीची कडी त्याच्याही वरची आहे. ती आपलें भक्ष्य दोन किंवा तीन तासांपेक्षा अधिक वेळ एकसारखें कधींच खात बसत नाही. इतका वेळ झाला की, तोंड पाय धुण्याचा तिचा उद्योग सुरू झालाच. चोंच व पाय धुऊन पुसून घासून साफसूफ करण्यांत तिचा बराच वेळ जातो. जणों काय, कृतकर्माचे प्रायश्चित्तच! आणखी, हे ती दिवसांतून कैक वेळां घेत असते. । हे पक्षी बहुधा कळप करून राहतात. पण त्यांचा आंडी घालण्याचा समय आला, की ते विभक्त होतात, आणि जोड्याजोड्यांनी राहू लागतात. कारण आंडी घालणे, ती उबविणे, त्यांची जोपासना करणे, पिलांना लहानाची मोठी करणे, जोड्याजोड्यांनाच करावे लागते. टिटवी दर खेपेस (मादी) तीन किंवा चार आंडी घालते. पण त्यांस निवान्याची किंवा अडोशाची जागा असेल तर शपथ ! दलदलीत, माळावर, किंवा जराशा उंच जमिनीवरच ती ठेवलेली आढळतात. टिटवीच्या आंड्यांतील बलक अतिशय रुचकर असतो, असें ह्मणतात.