या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आणि ह्मणूनच कित्येक देशांत-विशेषतः हालंडांतही आंडी जमा करून पुष्कळ लोक बाजारांत विकावयास आणतात. ही आंडी माळावर शोधण्याच्या कामी बायका, मुलें व कुत्रे ह्यांची योजना केलेली असते. ह्या पक्ष्याच्या दोन जाती आहेत. एका जातीस तुरा नसतो, पण तीस झगझगीत पिसारा असतो. ही जात फारशी आढळून येत नाही. आमच्या देशांत हीच जात असते. हिला इंग्रजीमध्ये 'स्विस् ल्याप उइंग' ह्मणतात. टिटवीचा मनुष्यप्राण्याला फार उपयोग आहे. कृमिकीटक, इत्यादि जिवांचा ती अतोनात फडशा पाडित असल्यामुळे, त्यांचा पुष्कळ त्रास कमी होतो. ह्यावरून आमच्या वाचकांचा कदाचित् असाही समज होईल की, ह्या पक्ष्याचा पाश्चात्य देशांत तरी मोठा गारवाहात असल. पण येवढे भाग्य त्या बिचाऱ्याच्या कपाळी कोठचे असणार ? त्याच्या आंगांतील रुचकर मांस, हेच त्याच कट्ट शत्रु असल्यामुळे, सदानकदा बंदुका पिस्तुलांची त्याच्या मागें गर्दी असते ! सणावारी सुद्धां ह्याची भाजी करण्यास चुकत नाहीत. हा पक्षा इतका सुंदर, इतका रंगेल, व इतका गोजिरवाणा असूनही त्याची मनुष्यास कीव येत नाही, हा केवढा चमत्कार ? पण चमत्कार तरी कोणाला : आह्मां आयेलोकांना. परदेशीयांना विधि काय आणि निषेध काय - बायकांकरितां गाणे. गाण ME कृष्णस्तवमा (पारिजातकानिमित्त भामा रुसली श्रीहरिवरी-ह्या चालीवर; अथवा भला का जन्म हा तुला लाधला' हीही चाल लागते.) पुजू चला व्रजविलास यदुपति कुलावतंसा भला । जा साजणी तोच सखा आपला ॥ ध्रु० ॥ उठा झटाझट लुटावयाला हरिनामामृत घटा । करूं या सुरसपान घटघटां ॥ श्रीरंग खेळतो रंग रंगणी सुरंग यमुनातटा । म आळवू नंदबाळ गोमटा ॥